अमरावती - अनेक समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या मेळघाटातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई ( Melghat water Problem ) आहे. चिखलदरा तालुक्यात डोंगर कपारीत वसलेल्या खडीमल या गावाची पाणीटंचाईमुळे विदारक परिस्थिती ( Melghat Water Scarcity ) आहे. सध्या स्थितीत या गावातील विहिरी मध्ये पाणी सोडण्यासाठी टँकर येताच पाणी भरण्यासाठी पूर्णगाव विहिरीवर तुटून पडते, असे भीषण चित्र पहायला मिळते.
गावात दोन विहिरी त्याही कोरड्या - सातपुडा डोंगरात असलेल्या ह्या गावात दोन विहिरी आहेत मात्र या विहिरी मधील पाणी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच आटत असल्यामुळे सलग नऊ ते दहा महिने गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शासनाच्या वतीने गावालगत एक हापशी देण्यात आली मात्र या फसिला सुद्धा पाणी नसल्यामुळे ग्रामस्थ पाण्याविना त्रस्त आहेत.
टँकर येताच गावाला येते जत्रेचे स्वरूप - धारणी मार्गावर सेमाडोहपासून 40 किलोमीटर आज जंगलात वसलेल्या खडीमल या गावात एखाद्या वाहनाने पोहोचणे अतिशय कठीण काम असून नको करूस मला कायदे परतवाडा शहरातून या गावात एक टॅंकर कसाबसा पोहोचतो. गावात टॅंकर येताच गावाला जणू जत्रेचे स्वरूप येते घरातील लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्वच हातात मिळेल ते भांडे घेऊन विहिरीवर पोहोचतात. टँकरद्वारे विहिरीत टाकलेले पाणी अवघ्या काही मिनिटातच खडीम गावातील ग्रामस्थ काढून घेत आहेत.
गढूळ पाण्यामुळे आजाराची भीती - खडी मल गावात विहिरीत टँकरद्वारे टाकण्यात येणारे पाणी अतिशय गढूळ आहे असे गढूळ पाणी द्यावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांना विविध आजार होण्याची भीती आहे. मात्र दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे तहान भागवण्यासाठी मेळघाटातील आदिवासी बांधवांना दुर्दैवाने अशा गढूळ पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटात बादलीभर पाण्यासाठी त्राहीत्राही, 1500 गावकरी 2 टँँकर पाण्यावर!
हेही वाचा - Drought In Melghat : मेळघाटात दुष्काळाच्या झळा.. राणीगावात कोरड्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत