ETV Bharat / state

Pig Selfie Competition : डुकरांसोबत सेल्फी काढा आणि बक्षीस मिळवा, वाचा काय आहे स्पर्धा?

author img

By

Published : Jan 10, 2022, 7:57 PM IST

Updated : Jan 10, 2022, 10:17 PM IST

अमरावती येथील चांदुर रेल्वे शहरात डुकरांसोबत एक चांगला सेल्फी काढा आणि बक्षीस ( Pig Selfie Competition Amravati ) मिळवा, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बजरंग दल, साहस बहूउद्देशिय संस्था, विश्व हिंदू परिषदेने ( Vishva Hindu Parishad ) याचे आयोजन केले आहे. त्यात 70 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

Pig Selfie Competition
Pig Selfie Competition

अमरावती - आतापर्यत आपण बैलगाडा शर्यत, रेंड्याची झुंज, जनावराची उत्कृष्ट सजावट अशा एक ना अनेक विविध स्पर्धा आयोजन केल्याचे पाहिले आहे. मात्र, अमरावतीतील काही संघटनांनी डुकरांसोबत एक चांगला सेल्फी काढा आणि बक्षीस मिळवा, या स्पर्धेचे आयोजन ( Pig Selfie Competition Amravati ) केले आहे. या अनोख्या स्पर्धेची चर्चा आता जिल्हाभरात होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात मोठ्या प्रमाणाच डुकरांची मुक्त वावर आहे. हे डुक्कर गाडीवर लटकवलेले किराणा पिशवी, भाजीपाला, फळे आदींवर डल्ला मारतात. यामुळे नागरिकांचे माठे नुकसान होते. याबाबत वारंवार नगरपरिषदेला निवेदन देऊनही प्रशासन कारवाई करत नाही, असे साहस बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन ढोले यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदचे लक्ष वेधन्यासाठी या स्पर्धेचे ( Chandur Railway City Pig Selfie Competition ) आयोजन केले आहे. त्यात 70 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

डुकरांसोबत सेल्फी काढा स्पर्धेच्या आयोजकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

'डुकरांनी मानले नगरपरिषदेचे आभार'

नगरपरिषद डुकरांचा बंदोबस्त करत नाही म्हणून उपरोधिक बॅनर शहरात लावले होते. त्यावर चांदुरवासी व नगरपरिषदेचे आभार मानले होते. आपण आम्हाला आपल्या गावातील प्रत्येक परिसरामध्ये, चौकांमध्ये, बाजारामध्ये व प्रत्येक गल्लीत, कित्येक वर्षापासून राहण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद, असा टोला यावरुन नगरपरिषदेला लावला आहे. मात्र, नगरपरिषदेने हे बॅनर काढले आहे.

शहरात पाच हजारांपेक्षा जास्त डुकरे

चांदुर रेल्वे शहरात शंभर दोनशे नाही तर तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त डुकरांची संख्या आहे. यामुळे नागरिकांचे राहणे कठीण झाले आहे. नगरपरिषद त्यांचा बंदोबस्त करत नाही, असा आरोप बजरंग दलाचे बच्चू वानरे यांनी केला. तसेच, नागरिकांनी डुक्कर पकडो मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही बजरंग दलाचे बच्चू वानरे, साहस बहूउद्देशिय संस्थेचे चेतन भोले, विश्व हिंदू परिषदेचे गजानन ठाकरे यांनी केले.

नगपरिषद प्रशासन म्हणाले...

शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेकडून पाच ते सहा वेळा निवीदा काढण्यात आली. मात्र, कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लवकरच नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने डुकरांचा बंदोबस्त करेल, अशी माहिती नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक राहुल इमले यांनी दिली.

हेही वाचा - Funeral of Unclaimed Bodies in Pune : पुण्यात 1231 बेवारसांवर अंत्यसंस्कार, जाणून घ्या पालिकेची अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया?

Last Updated : Jan 10, 2022, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.