ETV Bharat / state

तहसीलदारांच्या तत्परतेने अपघातग्रस्ताला मिळाले उपचार: राष्ट्रीय महामार्गावरील घटना - अपघाताची अपडेट बातमी

संजय नंदने ( वय 47 ) हे आपल्या एमएच 31 इजे 6385 या दुचाकीने शहरात येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर मार लागल्याने ते बराच वेळ महामार्गावरच बेशुद्ध अवस्थेत पडून होते. यावेळी महामार्गाने जाणाऱ्या तहसीलदारांनी त्यांना तात्काळ मदत केली.

Nagpur Amravati Highway
अपघातग्रस्तांना मदत करताना तहसीलदार आणि त्यांचे सहकारी
author img

By

Published : Aug 7, 2021, 2:10 PM IST

अमरावती - दुचाकीच्या अपघातात रोडवर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणांना तहसीलदारांच्या तत्परतेने उपचार मिळाले. ही घटना नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री घडली. वैभव फडतारे असे जखमींना तात्काळ मदत करणाऱ्या तहसीलदारांचे नाव आहे. वैभव फडतारे हे तिवशाचे तहसीलदार आहेत.

तिवसा तालुक्यातील इसापूर येथील संजय नंदने ( वय 47 ) हे आपल्या एमएच 31 इजे 6385 या दुचाकीने शहरात येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर मार लागल्याने ते बराच वेळ महामार्गावरच बेशुद्ध अवस्थेत पडून होते. तर याच अपघातात सायकल स्वार असलेले कटारिया, ( रा सुरवाडी ) हे देखील जखमी अवस्थेत पडून होते. हा अपघात नेमका कशाने झाला हे आद्यपही कळू शकले नाही. जखमी अवस्थेत असलेले नंदने व कटारिया महामार्गावर पडून असताना कुणीही त्यांच्या मदतीसाठी सरसावले नाही.

वरखेडवरून तहसीलदार वैभव फडतारे हे राष्ट्रीय महामार्गाने जात असताना त्यांना महामार्गावर पडलेले संजय नंदने दिसून आले. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना उचलून रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर रुग्णवाहिकेला संपर्क करुन घटनेची माहिती दिली. काही क्षणातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदने यांना गंभीर जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी तलाठी वैभव देशमुख, वाहनचालक राठोड, राजाभाऊ देशमुख, दीपक धानोरकर यांनी देखील मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.