अमरावती - फ्रेजारपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अनिल बंडप्पा मुळे (वय. 32) यांनी 13 ऑगस्टला रहाटगाव रिंग रोड परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली असताना गाडगेनगर पोलीस तपास करीत असताना एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि विक्रम साळी यांच्या जाचाला कंटाळून अनिल मुळे यांनी जीवनयात्रा संपविली असल्याचे स्पष्ट होत आहे.
व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ..असे आहे प्रकरण -मूळचे नांदेडचे असणारे अनिल मुळे यांची 2018 मध्ये राजापेठ पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यावेळी 2014 मध्ये घडलेल्या एका प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे आली होती. 2014 पासून 2018 पर्यंत सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अशा नऊ जणांकडे या प्रकरणाचा तापस असताना एकाही आरोपीला अटक झाली नव्हती. 2018 मध्ये अनिल मुळे यांच्याकडे हे प्रकरण असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. आरोपींना अटक करणे त्यांना शक्य नव्हते. या प्रकरणात विधी अधिकाऱ्यांकडेही कुठलाही तोडगा नव्हता. त्यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी मुळे यांना शिक्षा म्हणून त्यांची इन्क्रीमेंट बाद केली होती. ही अशी संपूर्ण माहिती खुद्द अनिल मळे हे नांदेड येथील जिल्हा प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांच्याशी मोबाईल फोनवर बोलले असून त्यांच्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.माहिती देताना तपास अधिकारी
रामदास पाटील यांनी दिला अनिल मुळेंना धीर -
अनेक दिवस सुट्टीवर असणाऱ्या अनिल मुळे यांच्याशी हिंगोलीचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी संपर्क साधून संवाद साधला. कुठल्या अडचणीत आहेस, आपण मेहनतीने नोकरी मिळविली ती टिकवून ठेवायला हवी अशा शब्दात अनिल मुळे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ऑडिओ क्लिप ऐकता लक्षात येते. अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी त्यांचे रूम मेट असल्याने त्यांच्याशी बोलून तुझी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करु. तसेच पोलीस आयुक्त आरती सिंह या कशा आहेत. त्यांचीही भेट घेतो काळजी करू नको असेही रामदास पाटील अनिल मुळे यांच्याशी बोललेत.पोलीस उपायुक्त विक्रम साळी व उपायुक्त शशिकांत सातव