ETV Bharat / state

Students Food Poisoned : शासकीय एकलव्य आश्रमशाळेच्या ३४ विद्यार्थ्‍यांना नाश्‍त्‍यातून विषबाधा - विद्यार्थ्यांना नाश्त्यातून विषबाधा

शासकीय एकलव्य आश्रम शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना नाश्त्यातून विषबाधा झाल्याची घटना वडगाव फतेहपूर येथे घडली आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. सुरेंद्र ढोले यांनी दिली आहे. यातील काही विद्यार्थ्यांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Students Food Poisoned
३४ विद्यार्थ्‍यांना नाश्‍त्‍यातून विषबाधा
author img

By

Published : Jul 27, 2023, 10:43 PM IST

३४ विद्यार्थ्‍यांना नाश्‍त्‍यातून विषबाधा

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तालुक्‍यातील वडगाव फत्तेपूर येथील केंद्रीय शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी पोह्याचा नाश्‍ता केल्‍यानंतर त्‍यांना मळमळ, उलट्या सुरू झाल्‍याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विद्यार्थ्‍यांना लगेच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सर्व विद्यार्थ्‍यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. सुरेंद्र ढोले यांनी सांगितले आहे. याबाबत आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली.

अशी आहे घटना : वडगाव येथील एकलव्य निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी पोह्यांचा नाश्ता तसेच चहा घेतल्यानंतर त्यांना मळमळ होण्यास सुरवात झाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखलदरा येथील एकलव्य आश्रमशाळा गेल्या दोन वर्षांपासून वडगाव फत्तेपूर येथे भाड्याच्या इमारतीत चालवली जात आहे. या शाळेत सहावी ते बारावीपर्यंत जवळपास ३२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना कंत्राटदारामार्फत नाश्ता, भोजन पुरविले जाते. या विद्यार्थ्यांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

आमदार राजकुमार पटेलांनी केली चौकशी : विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोहे खाल्यानंतर त्यांना उलटी, मळमळणे सुरु झाले. त्यांनी हा प्रकार शिक्षकांना सांगितला. त्‍यांना लगेच अचलपूर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अचलपूर तहसीलदार संजय गरकल, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवघरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवळ राम काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांची चौकशी केली.

दोन दिवसांपूर्वीच आमदारांनी दिली होती भेट : दोन दिवस आधीच आमदार राजकुमार पटेल यांनी शाळेला भेट देत तेथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. केंद्रीय आश्रम शाळेत घडलेली घटना चिंताजनक असल्‍याचे सांगून या प्रकरणी चौकशी व्‍हावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे. या आश्रमशाळेत पंचक्रोशीतील मुला-मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी आज सकाळी नाश्ता केल्यानंतर ही घटना घडली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.