अमरावती- शहरातील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा सराव पेपर चक्क फुटपाथवर द्यावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणतीही सूचना न देता मैदान अचानक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना फुटपाथवर पेपर द्यावा लागला.
पोलीस भरती सराव परिक्षा देत होते विद्यार्थी-
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधी लेखी व नंतर ग्राऊंड पोलीस भर्तीच्या परीक्षेचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी आता तयारीला लागले आहे. सध्या विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून सराव करीत आहे. दर आठवड्याला या विद्यार्थ्यांचा सराव पेपर होतो. परंतु कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने सोशल डिस्टेंस ठेऊन आज या विद्यार्थ्यांचा सराव पेपर हा श्री शिवाजी शारिरीक महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता. पण कोणतीही सूचना न देता प्राचार्यांनी मैदान बंद केल्याने या शेकडो विद्यार्थना रसत्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर पेपर देण्याची वेळ आली असल्याचा आरोप प्रदीप वानखडे यांनी केला आहे.
हेही वाचा- परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
हेही वाचा- ..कन्फर्म झाल्यावर सांगतो; ईडी नोटीस प्रकरणावर खडसेंचा बोलण्यास नकार