ETV Bharat / state

वसुंधरा पाणलोट समितीतील सचिवावर भ्रष्टाचाराचा आरोप; विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

स्व. ओंकरराव भुजबळ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद ओंकार भुजबळ स्वमालकीसाठी वाचनालयातील साहित्य वापरत आहेत. यामध्ये कृषी साहित्याचे सर्व पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे सर्व पुस्तके, कृषी वाचनालयाला मिळालेली टीव्ही, इन्व्हर्टर व कृषी वाचनालयाचे 2 लाख रुपयाचे साहित्य संबधित अध्यक्षाच्या घरीच आढळलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

author img

By

Published : Jun 13, 2020, 4:57 PM IST

Amravati
तक्रारदार विद्यार्थी

अमरावती - चांदूरबाजारमधील तळेगाव मोहनामध्ये 2013 मध्ये शासनाद्वारे वसुंधरा पाणलोट समितीला कृषी वाचनालय मिळाले होते. परंतु, ते कृषी वाचनालय सध्या बंद अवस्थेत आहे. गावातील कुठल्याही विद्यार्थ्याला त्या वाचनालयाचा लाभ घेता येत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

वसुंधरा पाणलोट समितीतील सचिवावर भ्रष्टाचाराचा आरोप; विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वसुंधरा पाणलोट समितीला 2013 मध्ये हे कृषी साहित्य तालुका स्तरावरुन दिल्या गेले होते. ग्रा. प. ला ते साहित्य सुपूर्द केल्यावर या साहित्याचा उपयोग संबधित वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद भुजबळ व पाणलोट सचिव अनुप विजू भुजबळ हे स्वामालकिसाठी करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तळेगाव मोहनामधील वसुंधरा पाणलोट समितीला मिळालेले हे वाचनालय शासकीय आदेश नसताना बेकायदेशीररित्या स्व. ओंकरराव भुजबळ या संस्थेवर उतरवण्यात आले. स्व. ओंकरराव भुजबळ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद ओंकार भुजबळ स्वमालकीसाठी वाचनालयातील साहित्य वापरत आहेत. यामध्ये कृषी साहित्याचे सर्व पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे सर्व पुस्तके, कृषी वाचनालयाला मिळालेली टीव्ही, इन्व्हर्टर व कृषी वाचनालयाचे 2 लाख रुपयाचे साहित्य संबधित अध्यक्षाच्या घरीच आढळलेले आहेत.

वाचनालय वसुंधरा पाणलोट समितीमधील साहित्य तळेगाव मोहणामधील शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी व गावाच्या विकासासाठी वापरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडेही लेखी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे. आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.