ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवायचं? हा डोसा फायदेशीर - Instant Jowar Dosa Recipe

Instant Jowar Dosa Recipe: सामान्यतः उडद-मुग डाळ, रवा आणि तांदळासह विविध पदार्थांनी तयार केलला डोसा खातो. आज आरोग्यास फायदेशीर ठरेल, अशा डोस्याची रेसिपी सांगणार आहोत.

Instant Jowar Dosa Recipe
ज्वारी डोसा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 5, 2024, 1:37 PM IST

Instant Jowar Dosa Recipe: आज प्रत्येक जण हेल्थ कॉशिअस आहे. सकाळचा नाश्तासुद्धा आरोग्यास उपयुक्त ठरेल, अशाच मेन्युचा समावेश आपण न्याहारीत करण्याचा प्रयत्न करतो. त्यातही जवळपास आपण सर्वच साउथ इंडियन पदार्थ खाण्याचे शौकिन आहोत. डोसा हा त्यापैकी एक आहे. आतापर्यंत उडद-मुग डाळ, रवा आणि तांदळापासून तयार केलेला डोसा आपण खाल्ला असेल. पण हाच डोसा आपण वेगळ्या पद्धतीनं तयार केला तर त्यापासून शरीरातील वजन आणि साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

हा हेल्दी डोसा ज्वारीपासून तयार करता येतो. ज्वारीच्या पिठात २५ टक्के फायबर असतात. हा डोसा खाल्यानंतर दिवसभर पोट भरल्यासरखं तर वाटतंच, सोबत यापासून शरीराला बी-6 जीवनसत्त्व, थायमिन आणि नियासिन सारखे पोषक घटक सुद्धा मिळतात. त्यामुळं मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत होते. मुलं डोसा आवडीनं खातात. त्याच माध्यमातून तुम्ही मुलांचं सुदृढ आरोग्य राखू शकता. चला तर जाणून घेऊया डोसा तयार करण्याची पद्धत.

  • आवश्यक साहित्य
  • ज्वारीचं पीठ - १ कप
  • तांदळाचं पीठ - चतुर्थांश कप
  • रवा - चतुर्थांश कप
  • मीठ - चवीनुसार
  • जिरं - अर्धा टीस्पून
  • आलं - आवश्यकतेनुसार
  • हिरवी मिरची - ३
  • धणे, किसलेले गाजर - आवश्यकतेनुसार
  • पाणी - आवश्यक तेवढे
  • तेल - आवश्यकतेनुसार

डोसा कसा तयार करावा?

  • डोसा तयार करण्यासाठी आवश्यक तेवढ्या हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. तसंच आल्याचा छोटा तुकडा घेऊन बारीक किसून घ्या.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात ज्वारी आणि तांदळाच्या पिठासह रवा मिसळा.
  • नंतर पिठात चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, मीठ आणि पाणी घाला आणि मिक्स करा.
  • हे पीठ सामान्य डोसाच्या पिठापेक्षा थोडं पातळ करावं लागतं. त्यामुळे पाण्याच्या सहाय्यानं डोसा तयार होईल असं बॅटर बनवून घ्या.
  • स्टोव्हवर डोसा तवा ठेवा. तवा गरम झाल्यावर तव्याला थोडं तेल लावा. त्यानंतर पीठ घाला आणि डोसा तयार करा.
  • थोडं गाजर, कोथिंबीर घालून सर्व्ह करा. डोसा सोबत शेंगदाणे, टॉमटो, खोबरे चटणी असल्यास उत्तम.

हेही वाचा

  1. सावधान! बाजारात बनावट पनीर; अशी ओळखा भेसळ - How To Identify Fake Paneer
  2. केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे? आजच तयार करा ‘हे’ लाडू - How To Prepare Moringa Powder Ladoo

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.