अमरावती - जिल्ह्यातील कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शनिवारी सायंकाळपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंतच्या कडक संचारबंदीची लागू करण्यात आली. याकरिता शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लॉकडाऊन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी रस्त्यांवर पाहणी केली. दरम्यान आज अमरावती जिल्ह्यात वर्षभरातील सर्वाधीक तबल 727 नवे रुग्ण आढल्याने व 7 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप -
आजपासून सुरू झालेल्या या 36 तासाच्या लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. जे व्यावसायिक लॉकडाऊनचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. जे पोलीस कर्मचारी सध्या तैनात आहे, त्यांना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप सुद्धा केले. दरम्यान अमरावतीकरांनी लॉकडाऊनला चांगले सहकार्य केले असून पुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
तोपर्यंत संचारबंदीचे पालन करावे -
कोरोना संकट वाढत असल्याने सगळयांचीच चिंता वाढली असून जिल्ह्याचा संक्रमण व मृत्यूदरही कमालीचा वाढला आहे. यावर उपाय म्हणून जिल्ह्यात दररोज रात्री ८ वाजता लॉकडाउन व दर रविवारी कडक संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी बंद झालेले व्यवहार व व्यापार आता थेट सोमवारी सकाळीच पूर्ववत होईल. तोपर्यंत संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत.
ही आहेत प्रतिबंधित क्षेत्रे -
श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजन पुरा, एलआयसी कॉलनी, भाजी बाजार, अनुराधा नगर, सद्गुरुधाम वसाहतजवळ, चंद्रावतीनगर, उषा कॉलनी, भारत नगर, साईनगर, खंडेश्वर कॉलनी हा परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा - कर्नाटक सरकारने कोगनोळी टोल नाक्यावर पुन्हा सुरू केला 'कोरोना चेक पोस्ट'