ETV Bharat / state

Veterinary Hospital : आता गायी-म्हशींचाही निघणार एक्स-रे; अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

28 जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. प्राणी चाचणी, शल्य चिकित्सेची फाइवस्टार व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे. पशुचिकित्सालयामध्ये गायी, म्हशींवर गंभीर स्वरुपाच्या आजारात शस्त्रक्रिया करणे, एक्स-रे काढणे अशा सर्व सुविधा अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने केल्या जाणार आहेत.

Veterinary Hospital
पशुवैद्यकीय रुग्णालय
author img

By

Published : Jul 27, 2023, 5:50 PM IST

Updated : Jul 27, 2023, 6:40 PM IST

डॉ. सुनील सूर्यवंशी, विनय बोथरा यांची प्रतिक्रिया

अमरावती : गायी, म्हैस, बैल यांसारख्या मुक्या जनावरांना आजारपणात योग्य उपचार मिळावेत, यासाठी अमरावतीत अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदुरा बुद्रुक या गावात महाराष्ट्रातील प्राण्यांचे पहिले पंचतारांकित रुग्णालय बांधण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते तसेच वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन 28 जुलै रोजी करण्यात येणार आहे. गोकुलम गौरक्षण संस्थेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या पशुचिकित्सालयात प्राण्यांवर अगदी फाईव्ह स्टार दर्जाच्या वातावरणात उपचार केले जातील.

अशी आहे व्यवस्था : गोकुलम गौरक्षण संस्थेची स्थापना अमरावती शहरातील बालरोग तज्ञ डॉ. हेमंत मुरके यांच्या पुढाकाराने 2013 मध्ये नांदुरा बुद्रुक या गावात करण्यात आली होती. या ठिकाणी आजारी गायींवर उपचार करण्यासाठी पशु चिकित्सालय सुरू करण्यात आले होते. यासह अमरावती जिल्ह्यात कुठेही एखादी गाय आजारी पडली, तर तिला या गौरक्षण संस्थेत आणून तिच्यावर उपचार केले जात होते. यासाठी खास ॲम्बुलन्सची व्यवस्था देखील करण्यात आली होती. शहर, जिल्ह्यातील अनेक पशु पालकांसाठी गोकुलम गौरक्षण संस्था दिलासा देणारे केंद्र बनले होते. मात्र आता या ठिकाणी असणाऱ्या पशुचिकित्सालयाचे रूपांतर अत्याधुनिक अशा पशु चिकित्सालयामध्ये करण्यात आले आहे. या पशुचिकित्सालयामध्ये गायी, म्हशींवर गंभीर स्वरूपाच्या आजारात शस्त्रक्रिया करणे, एक्स-रे काढणे अशा सर्व सुविधा अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने केल्या जाणार आहे, अशी माहिती गोकुलम गौरक्षण संस्थेचे विश्वस्त विनय बोथरा यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

31 हजार 586 आजारी गोवंशावर उपचार : वृद्ध, भाकड अपघातग्रस्त गोवंशांची तसेच इतर प्राण्यांची सेवा गोकुलम गौरक्षण संस्थेत प्रामुख्याने केली जाते. सध्या या ठिकाणी एकूण 278 आजारी गोवंशांचे पालन पोषण केले जात आहे. अमरावती परिसरातील प्राणी, पशुपक्षींवर निशुल्क औषधोपचार, चिकित्सा शस्त्रक्रिया करणारी राज्यातील एकमेव संस्था म्हणून गोकुलम गौरक्षण संस्था ओळखली जाते. 2015 ते 2023 या आठ वर्षात एकूण 31 हजार 586 पशुपक्षी, प्राण्यांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. या संस्थेत चार पशुवैद्य सेवा देत असून 10 पेक्षा अधिक सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी निशुल्क सेवा देत आहेत, असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

गोकुळम गौरक्षण संस्थेला लागणारा पैसा हा गौरक्षा संस्थेतील गायींच्या गोमूत्र आणि शेणातून विविध प्रयोगातून तयार होणाऱ्या खत औषधातून येतो. तसेच या ठिकाणी गोमूत्रापासून विविध आजारांवर उपयुक्त औषधी तयार केली जाते - डॉ. सुनील सूर्यवंशी

पक्षांसाठी कबूतरखाना : गोकुलम गौरक्षण संस्थेच्या परिसरात पहिल्यांदाच कबूतरखाना निर्माण करण्यात आला आहे. या परिसरात पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास अनेक पक्षी येतात. या पक्षांना निवारा मिळावा तसेच त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी खाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षांसाठी खास पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे.

आदिवासींना शेतीसाठी दिले जातात बैल : कटाईसाठी जाणारे बैल पोलिसांनी पकडल्यावर ते थेट गोकुलम गौरक्षण संस्थेत रीतसर आणले जातात. यासह जिल्ह्यातील विविध गौरक्षण संस्थेत पोलिसांमार्फत येणारे बैल देखील गोकुलम गौरक्षण संस्थेत आणले जातात. या बैलांवर उपचार केल्यावर हे बैल मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांना शेतीकामासाठी कायदेशीर रित्या दिले जातात, अशी माहिती देखील डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

पशु पालकांना राहण्याची व्यवस्था : गोकुलम गौरक्षण संस्थेच्या वतीने आपल्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात वर्षातून तीन ते चारवेळा पशुपालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाते. प्रशिक्षण काळात राज्यभरातून येणाऱ्या पशुपालकांची राहण्याची व्यवस्था गोकुलम गौरक्षण संस्थेत करण्यात येते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार उद्घाटन : सुमारे 400 एकर जागेत पसरलेल्या गोकुलम गौरक्षण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुचिकित्सालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 28 जुलैला होणार आहे. कबूतर खाण्याच्या परिसरात अतिशय सुंदर उद्यान साकारण्यात आले असून या ठिकाणी विविध महापुरुषांचे पुतळे, विविध रंगांची फुलझाडे या परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त करून देतात. अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी येतात. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या या नव्या उपक्रमांचा शुभारंभ होणार असून जय्यत तयारी सुरू असल्याचे डॉ. सुनील सूर्यवंशी म्हणाले.

Last Updated : Jul 27, 2023, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.