अमरावती - विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ म्हणजे चिखलदरा. या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात 'चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार असून ही बस सेवा दररोज सकाळी ८ वाजता आणि दुपारी २ वाजता पर्यटक माहिती केंद्र, चिखलदरा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बस सेवेचा वापर करून या सेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, अशी आशा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून व्यक्त करण्यात आली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे पर्यटकांसाठी 'चिखलदरा दर्शन' बससेवा
चिखलदरा येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात 'चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार आहेत.
अमरावती - विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ म्हणजे चिखलदरा. या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात 'चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार असून ही बस सेवा दररोज सकाळी ८ वाजता आणि दुपारी २ वाजता पर्यटक माहिती केंद्र, चिखलदरा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बस सेवेचा वापर करून या सेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, अशी आशा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून व्यक्त करण्यात आली.
पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी उपक्रम
अमरावती अँकर
विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण व निसर्ग प्रेमींना आकर्षित करणारे पर्यटन स्थळ चिखलदरा या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत मापक दरात चिखलदरा दर्शन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार असून हि बस सेवा दर दिवशी सकाळी ८ वा. व दुपारी २ वा. पर्यटक माहिती केंद्र, चिखलदरा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बस सेवेचा वापर करून त्यास जास्तीत जास्त प्रतिसाद देतील अशी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून इच्छा व्यक्त करण्यात आली.
चिखलदरा येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी श्रीमती पियुषा जगताप, श्री अविनाश कुमार, मेळघाट वनविभाग, परतवाडा, श्री विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा आणि डॉ. सिवाबाला, उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग तसेच मेळघाट वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री व्ही.डी. डेहनकर आणि समस्त कर्मचारी वृंद, गाविलगड परिक्षेत्र यांची उपस्थिती होतीBody:अमरावतीConclusion:अमरावती