ETV Bharat / state

अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर

मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. हाताशी असलेल्या सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले असून कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे दिवाळीच्या नेत्रदीपक रोषणाईने घरे सजली आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत सापडलेला आहे.

सोयाबीन
author img

By

Published : Oct 27, 2019, 9:57 PM IST

अमरावती- मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. हाताशी असलेल्या सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले असून कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे दिवाळीच्या नेत्रदीपक रोषणाईने घरे सजली आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत सापडलेला आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी

नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाला प्राधान्य देत असतात. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक घरी आले की शेतकरी ते पीक बाजारपेठेत विकून दोन पैसे कमवतात व आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात. परंतु, यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरण्याही लांबल्या होत्या. त्यातच मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. परिणामी, उत्पादनात घटही झाली. असे असताना मात्र, आता सोयाबीन पीक साथ देईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आठ दिवसा पासून सुरू असलेल्या या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पीक खराब झाले आहे. उभे पीक सडत आहे. तर, कापणी करून शेतात पडलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे तेल निघाले आहे.

ही परिस्थिती फक्त सोयाबीनची नसून कापसाच्या पिकालाही याचा जबर फटका बसला आहे. दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचनीला सुरवात होत असते. परंतु, पाऊस असल्याने व पोषक वातावरण नसल्याने कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपल्या असून निकालही लागले आहे. सत्ता स्थापनेच्या चर्चा जोर धरत असतांना मात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाईबद्दल सरकार उदासीन असल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा- आमदार रवी राणा समर्थक अन् शिवसैनिकांमध्ये जोरदार हाणामारी

Intro:सोयाबीनला कोंब फुटले.कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर.

ऐन दिवाळीत शेतकऱ्याच निघालं दिवाळ.
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर

मागील आठ दिवसा पासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन ला शेतातच कोंब फुटले असून कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे.एकीकडे दिवाळीच्या नेत्रदीपक रोषणाईने घरे सजली असतांना मात्र या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच दिवाळ काढल्याने
ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत सापडलेला आहे..

  नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाला प्राधान्य देत असतात. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक घरी आले की शेतकरी सोयाबीन बाजारपेठेत विकून दोन पैसे मिळाले की आपल्या कुटूंबा सोबत दिवाळी साजरी करतात. परंतु या वर्षी पावसाळा उशीरा सुरू झाल्याने पेरण्याही लांबल्या होत्या. त्यातच मध्यतरी पावसाने दडी मारली होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला परिणामी उत्पादनात घटही झाली. असे असताना मात्र आता सोयाबीन पीक साथ देईल अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती.परन्तु आठ दिवसा पासून सुरू असलेल्या या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पीक खराब झाले आहे.उभे पीक सडत आहे.तर कापणी करून शेतात पडलेले सोयाबीन ला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे तेल निघाले आहे.ही परिस्थिती फक्त सोयाबीनची नसून कापसाच्या पिकालाही याचा जबर फटका बसला आहे.दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचनीला सुरवात होत असते परंतु पाऊस असल्याने व पोषक वातावरण नसल्याने कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे...

राज्यातील विधानसभेच्या निवडणूका संपल्या असून निकालही लागले आहे.सत्ता स्थापनेच्या चर्चा जोर धरत असतांना मात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाई बदल सरकार उदासीन असल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे....Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.