ETV Bharat / state

Transgender Assembly Amravati : समाजाने आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी, अमरावतीतील संमेलनात तृतीयपंथीयांची मागणी

आम्ही आज समाजासाठी एक शिवी झालो आहे. ज्या समाजाने मला निर्माण केले तोच समाज आज आम्हाला हीन दर्जाची वागणूक देतो. सर्वसमान्यांप्रमाणेच आम्हालासुद्धा आमच्या आई-वडिलांनी जन्म दिला आहे. आमच्या प्रति समाजाची धारणा बदलायला खूप वेळ लागेल. आम्ही सुद्धा माणसं आहोत, हे समाजाने समजून घ्यावे. आमचे सुद्धा समाजात अस्तित्व आहे हे समाजाने मान्य करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय मंगलसुखी किन्नर संमेलनाचे (All India Mangalsukhi Kinnar Samelan) आयोजन शहरातील धर्मदाय कॉटन मार्केटच्या प्रांगणात करण्यात (Transgender Assembly Amravati) आले आहे. या राष्ट्रीय संमेलनासाठी देशभरातून तृतीपंथी शहरात दाखल झाले आहेत. (Latest news from Amravati)

Transgender Assembly Amravati
किन्नर संम्मेलन
author img

By

Published : Jan 2, 2023, 5:11 PM IST

तृतीयपंथीयाने संमेलनात मांडलेले विचार

अमरावती: विदर्भ बहुउद्देशीय किन्नर संस्था, अमरावती या संस्थेने दिनांक १ ते 15 जानेवारी पर्यंत आयोजन केले आहे.पंधरा दिवस चालणाऱ्या या संमेलनाला (Transgender Assembly Amravati) देशभरातून ५०० ते ६०० तृतीयपंथीय हजेरी लावणार आहे. अकोला, मूर्तिजापूर ,यवतमाळ , नागपूर, राजस्थान, मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश, दिल्ली ,पंजाब, हरियाणा, इंदौर ,जम्मु काश्मीर ,हरियाणा , पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांबरोबरच इतरही राज्यांतील हजारोंच्या संख्येने तृतीयपंथीय या संमेलनात सहभागी होत आहेत. (All India Mangalsukhi Kinnar Samelan) यासह संपूर्ण भारतातून तृतीयपंथी शहरात दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच शहरातील धर्मादाय कॉटन मार्केटच्या प्रांगणात हे राष्ट्रीय स्तरावरचे संमेलन होत आहे. या संमेलनामध्ये तृतीयपंथीयांच्या विविध सामाजिक व उदरनिर्वाहाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. (Latest news from Amravati)

समाजभवनासाठी जागा द्यावी : आम्ही पण एक समाजाचा भाग आहोत. आमचा जन्म ही याच मातीत झाला आहे, अशी भावना मूर्तिजापूर येथून आलेल्या नेहा नायक यांनी यावेळी व्यक्त केली. तृतीय पंथीयासाठी एखादे भवन अथवा सभागृह बांधण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यास आमची सोय होईल, अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.