अमरावती : धर्म ही अपरिहार्य सामाजिक संस्था : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती (124th birth anniversary of Punjabrao Deshmukh) उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे (Shree Shivaji Educational Institute) आयोजित 'डॉ. पंजाबराव देशमुख (Dr Punjabrao Deshmukh) स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. भैयासाहेब पाटील पुसदेकर है होते. भाऊसाहेबांचा धर्माचार हा समाजशास्त्रीय अंगाने असून मानवमुक्तीचा विचार, लोकशाही विचार आणि मानव अधिकार अशा अंगाने तो आहे. जे सर्व हक्कांपासून वंचित होते अशा सर्वांना नकाशावर आणणे हे धर्माचे प्रयोजन आहे.
धर्म संकल्पना ही मानव निर्मित आहे : नव विचारांची, नव समाजाची, नव राष्ट्राची पेरणी करणारा पायाभूत विचार त्यांनी दिला. धर्म ही अपरिहार्य सामाजिक संस्था असून ती इहलोकांच्या कल्याणासाठी आहे. धर्म संकल्पना ही मानव निर्मित आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंजाबराव देशमुख यांनी आपल्या प्रबंधातून केले आहे, असेही जोशी म्हणाले.
धर्माच्या नावावर मानवाचे पशुकरण : काही तत्त्वे, काही सिद्धांत आणि श्रद्धा यांना अनुसरून असलेले मानवी सुख वृद्धिगत करण्याचा उद्देश असलेला धर्म हा आचारशील असतो', अशी सरळ सोपी व्याख्या भाऊंनी केली असून आयोजन केले त्यांचे पुढील सर्व कार्य हे या संकल्पनेवर आधारलेले आहे. मुळात धर्मनिरपेक्षता हा सुध्दा एक धर्म आहे. भारतीय संस्कृती ही कधीही धर्मदेषाने व्यापलेली नव्हती म्हणून ती टिकून आहे. भारतात राजाश्रयाने धर्माला जगविले पण धर्माच्या नावावर कोणत्याही राजाने राज्य केले नाही. आज मात्र संपूर्ण जगात धर्माच्या नावावर मानवाचे पशुकरण सुरु झाले असून अशा वेळी आपण विवेकानंद, भाऊसाहेब, गांधी, आंबेडकर यांच्या विचारांपासून का पळ काढत आहोत? असा सवालही जोशी यांनी केला.