अमरावती - परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांडली ग्रामपंचायत परिक्षेत्रात रात्री ११.३० च्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य गंगा उर्फ दिलीप धंडारे यांच्यावर कोणीतरी गोळीबार केला. या हल्ल्यात धंडारे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात कांडली येथील ग्रामपंचायत सदस्य धंडारे यांच्यावर निमकर यांच्या लेआऊट समोर अज्ञात इसमाने बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी धंडारे यांच्या हाताला घासुन गेल्याचे सांगीतले जात आहे. ही बंदुकीची गोळी होती की छरा होता हे अस्पष्ट आहे. घटनेबाबत संभ्रम असल्याने केवळ पोलीस दप्तरी नोंद घेण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.