अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार असा इशारा दिल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या घरावर मोर्चा काढला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला.
हनुमान चालीसा पठन करण्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठणासाठी आवाहन करणाऱ्या राणा दांपत्याविरोधात अमरावती शहर आणि जिल्हा शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्यामुळे अमरावती सध्या तणावाचे वातावरण आहे. आमदार रवी राणा यांच्या घरासमोर देखील युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहे. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.