ETV Bharat / state

'प्रीती बंड राजकारणात नवख्या; सुनील खराटे योग्य उमेदवार, फेक कॉलमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ - fake call news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रीती बंड यांना बडनेरा मतदार संघातून संधी दिली जाईल असे सुतोवाच केले होते. असे सारे असताना बडनेरा मतदार संघातील शिवसैनिकांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल येत आहे. यात 'प्रीती बंड या राजकारणात नवख्या आहे. त्यांना राजकारणातले काहीएक कळत नसताना काही लोक त्यांना राजकारणात ओढत असल्याचे म्हटले जात असल्याने शिवसैनिकांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

फेक कॉलमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:25 PM IST

अमरावती - 'प्रीती बंड या राजकारणात नवख्या आहेत. त्यांना राजकारणातले काहीएक कळत नसताना काही लोक त्यांना राजकारणात ओढत आहेत. खरंतर सुनील खराटे हे योग्य उमेदवार असून वरिष्ठांकडून विचारले गेले तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल असेच बोला', अशा स्वरूपाचा कॉल बडनेरा मतदारसंघातील शिवसैनिकांना येत आहे. हा कॉल फेक असून कॉल करणारी व्यक्तीही फेक आहे असे स्पष्ट झाले असताना, असा खोडसाळ प्रकार केला जात असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

फेक कॉलमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ

बडनेरा विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. बडनेरा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेसाठी सुटेल असे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अमरावतीत नेहरू मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रीती बंड यांना बडनेरा मतदारसंघातून संधी दिली जाईल, असे सुतोवाच केले होते. तर, येत्या १-२ दिवसात बडनेरा मतदारसंघातून प्रीती बंड यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. असे सारे असताना बडनेरा मतदारसंघातील शिवसैनिकांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल येत आहे.

हेही वाचा - अंजनगाव सुर्जीमध्ये अवैध सागवान साहित्य जप्त; वन विभागाची कारवाई
या फोनकॉलमध्ये आपण शिवसेना भवनातून बोलत असल्याचे सांगून प्रीती बंड यांच्याऐवजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे योग्य उमेदवार आहेत. असे सांगून वरिष्ठांनी कॉल केला तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल, आम्ही प्रामाणिकपणे काम करू इतकेच उत्तर द्या, असा सल्ला कॉल करणारी व्यक्ती शिवसैनिकांना देत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीला शिवसैनिकांकडून सुनील खराटे यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर मतदारसंघात आहे. असे सांगितले जात असताना यावर संबंधित व्यक्ती 'आम्ही अमरावतीत माहिती घेतली असून सर्वजण सुनील खराटे यांनाच तिकीट द्या असे सांगत आहे. विशेष म्हणजे युती जरी झाली नाही तरी सुनील खराटे हे निवडून येऊ शकतात हे निश्चित आहे. यामुळे तुम्हाला वरिष्ठांचा फोन आला तर तुम्ही सुद्धा अशीच बाजू घ्या.' असेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - अमरावतीच्या व्यापाऱ्याकडून पुसद येथे 18 लाखांची रोकड जप्त
शिवसेना भवनातून येणारा हा कॉल नेमका कोणत्या नेत्याचा असावा? असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला आहे. तर, फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज व्यवस्थित ऐकल्यावर या व्यक्तीची मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नसून अमरावतीची मराठी भाषा असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे असा प्रकार नेमका कोणी केला असावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अतिशय जवळचे असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे गेल्या २-३ वर्षापासून बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावतीने कोणीतरी असा खोडसाळपणा केला असावा अशी शंका काही शिवसैनिकांनी घेतली आहे. यासोबतच बडनेरा मतदार संघाचे विद्यमान आमदार रवी राणा यांच्या समर्थकांपैकी कोणीतरी हा प्रकार केला असल्याची शंकही अनेकांना आहे.

हेही वाचा - 'अंबा एक्सप्रेस'मध्ये तळीरामांसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी
बडनेरा मतदार संघात भाजप शिवसेनेची युती झाली आणि प्रीती बंड या युतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असल्या, तर आमदार रवी राणा यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होण्याची शक्यता आहे. प्रीती बंड यांच्यापेक्षा सुनील खराटे यांना युतीची उमेदवारी मिळाली तर बडनेरा मतदार संघातून आमदार रवी राणा हे विक्रमी मतांनी निवडून येऊ शकतात. राणा यांच्या कार्यकर्त्यांचा असा समज असल्याने हा प्रकार युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला असावा अशी चर्चाही रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एका गटाने शिवसेना भवन मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून कॉल करणाऱ्या भामट्याकडे लक्ष देऊ नका अशा स्वरूपाचे मेसेज सर्व शिवसैनिकांना पाठविले आहे.

हेही वाचा - महावितरणच्या बेजबाबदार कारभाराने वृद्ध शेतकऱ्याचा बळी
सध्या शिवसैनिकांना येणारा कॉल हा बडनेरा मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे. असा कॉल करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल करून अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवहानही काही शिवसैनिकांकडून केले जात आहे.

Intro:(ओडियो क्लिप whatsapp वर पाठवतो) 'प्रीती बंड्या राजकारणात नवख्या आहे त्यांना राजकारणातले काहीएक कळत नाही असे असताना काही लोक त्यांना राजकारणात ओढत आहेत. खरंतर सुनील खराटे हे योग्य उमेदवार असून वरिष्ठांकडून विचारले गेले तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल असेच बोला', अशा स्वरूपाचा कॉल बडनेरा मतदार संघातील शिवसैनिकांना येतो आहे. हा कॉल फेक आहे आणि कॉल करणारी व्यक्ती ही फेक आहे असे स्पष्ट असताना असा खोडसाळ प्रकार केला जात असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

Body:बडनेरा विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. बडनेरा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेसाठी सुटेल असे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना बडनेरा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अमरावतीत नेहरू मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रीती बंड यांना बडनेरा मतदार संघातून संधी दिली जाईल असे सुतोवाच केले होते. येत्या एक-दोन दिवसात बडनेरा मतदार संघातून प्रीती बँड यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. असे सारे असताना बडनेरा मतदार संघातील शिवसैनिकांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल येतो आहे. आपण शिवसेना भवनातून बोलत असल्याचे सांगून प्रीती बँड यांच्याऐवजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे योग्य उमेदवार आहे, असे सांगून वरिष्ठांनी कॉल केला तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल,आम्ही प्रामाणिकपणे काम करू इतकेच उत्तर द्या, असा सल्ला कॉल करणारी व्यक्ती शिवसैनिकांना देत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीला शिवसैनिकांकडून सुनील खराटे यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर मतदार संघात आहे असे सांगितले जात असताना यावर संबंधित व्यक्ती 'आम्ही अमरावतीत माहिती घेतली आहे. सर्वजण सुनील खराटे यांनाच तिकीट द्या असे सांगत आहे विशेष म्हणजे युती जरी झाली नाही तरी सुनील खराटे हे निवडून येऊ शकतात हे निश्चित आहे. यामुळे तुम्हाला वरिष्ठांचा फोन आला तर तुम्ही सुद्धा अशीच बाजू घ्या.' असेही ही सांगण्यात येत आहे. शिवसेना भवनातून येणारा हा कॉल नेमका कोणत्या नेत्याचा असावा ? असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला असता या फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज व्यवस्थित ऐकला असताना या व्यक्तीची मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नसून अमरावतीची मराठी भाषा असल्याचे स्पष्टपणे जाणवते. हा प्रकार खोडसाळपणाचा असून असा प्रकार नेमका कोणी केला असावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अतिशय जवळचे असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे गेल्या दोन-तीन वर्षापासून बडनेरा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावतीने कोणीतरी असा खोडसाळ पणा केला असावा अशी शंका काही शिवसैनिकांनी घेतली आहे. यासोबतच बडनेरा मतदार संघाचे विद्यमान आमदार रवी राणा यांच्या समर्थकांपैकी कोणीतरी हा प्रकार केला असाव अशी शंकही अनेकांना आहे. बडनेरा मतदार संघात भाजप शिवसेनेची युती झाली आणि प्रीती बँड या या युतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असल्या तर आमदार रवी राणा यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होण्याची शक्यता आहे. प्रीती बंद यांच्यापेक्षा सुनील खराटे यांना युतीची उमेदवारी मिळाली तर बडनेरा मतदार संघातून आमदार रवी राणा हे विक्रमी मतांनी निवडून येऊ शकतात असा राणा यांच्या कार्यकर्त्यांचा समज असल्याने हा प्रकार युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला असावा अशी चर्चाही रंगली आहे .दरम्यान शिवसेनेच्या एका गटाने शिवसेना भवन मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून कॉल करणाऱ्या भामट्याकडे लक्ष देऊ नका अशा स्वरूपाचे मेसेज सर्व शिवसैनिकांना पाठविले आहे. सध्या शिवसैनिकांना येत असलेला कॉल हा बडेरा मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे. असा कॉल करणाऱ्या व्यक्ती सोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल करून अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवहानही काही शिवसैनिकांकडून केले जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.