अमरावती - महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांचा कोविड १९ अंतर्गत को-व्हॅक्सिन या लसीचा पहिला डोज घेवून २८ दिवस पुर्ण झाले आहेत. त्यांचा दुसरा डोस रविवारी शहरातील ११ लसीकरण केंद्रांवर देण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून को-व्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असून नमुद लसीकरण केद्रांवरुन फक्त को-व्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस सकाळी ९ ते ५ या वेळांमध्ये देण्यात येणार आहे. उपलब्ध लसीच्या प्रमाणात वाटण्यात येईल. टोकन वाटप सकाळी ७ वाजता करण्यात आले. आयसोलेशन दवाखाना, दसरा मैदान येथील केद्रांवर दिव्यांग व्यक्ती व ७० वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, मनपा दवाखाना भाजीबाजार, आयसोलेशन दवाखाना, मनपा दवाखाना मसानगंज, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, दंत महाविद्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, शहरी आरोग्य केंद्र दस्तुरनगर, हरीभाऊ वाट दवाखाना, जुनीवस्ती, बडनेरा, परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा सामान्य रुग्णाालयासमोर व ट्रेनिंग इ्स्टिटट्यूट, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येत आहे.
हेही वाचा - कृषी पर्यटन दिन : कोरोनात्तोर काळात कृषी पर्यटनाला मिळेल मोठी चालना