ETV Bharat / state

कोरोनाची धास्ती : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद; खबरदारीचे आवाहन - कोरोना अपडेट्स

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे तरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पारित केले आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद

author img

By

Published : Mar 15, 2020, 3:59 PM IST

Updated : Mar 15, 2020, 4:39 PM IST

अमरावती - संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे तरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पारित केले आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद

कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्य शासनाने शनिवारी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आदेश पारित केले होते. दरम्यान मुंबई पुण्याच्याच शाळा, महाविद्यालय बंद राहणार की काय, असा संभ्रम अनेकांच्या मनात होता. असे असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविरारी राज्य शासनाच्या आदेशानुसार आपल्या वतीने आदेश पारित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती महानगरपालिका क्षेत्रासह सर्व नगरपालिका नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खासगी शाळा तसेच महाविद्यालय व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र व खासगी शिकवणी वर्ग 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्यात यावी असेही, जिल्हाधिकारी नवल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागानेच दाखवली केराची टोपली

जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, तरण तलाव 31 मार्च पर्यंत बंद राहणार असून सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रमही 31 मार्चपर्यंत आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले आहे. शहरातील डी मार्टसारख्या मार्केटमध्ये लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू घ्यायच्या असल्यामुळे सध्यातरी डी मार्ट सारख्या मॉलवर तसेच जोशी मार्केट सारखे गजबजलेले मार्केट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र, येत्या दोन-चार दिवसात यदाकदाचित परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येतात डी-मार्टसह महत्त्वाचे मार्केट बंद ठेवण्यात येण्याबाबत विचार केला जाईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - 'त्या' डॉक्टरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी तरुणाने मागितली माफी

Last Updated : Mar 15, 2020, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.