ETV Bharat / state

अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी; नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न - sand mafia amravati news

भातकुली तालुक्यातील पेढी नदीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मिळाली. त्याआधारे ते आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नदीपात्रात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेले होते. दरम्यान, अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला थांबवले असता त्याने थेट नायब तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला.

अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी
अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी
author img

By

Published : Sep 30, 2020, 3:36 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अनेक रेतीघाटंचे लिलाव न झाल्याने वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या नायब तहसीलदार यांच्या अंगावर थेट वाळू माफियांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना भातकुली तालुक्यातील पेढी नदीत घडला आहे. नायब तहसीलदार या घटनेत थोडक्यात बचावले असून तीन वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी

जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पेढी नदीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मिळाली होती. त्याआधारे नायब तहसीलदार हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नदीपात्रात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेले होते. अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला नायब तहसीलदारांनी थांबवले असता त्याने थेट तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यात सुदैवाने नायब तहसीलदार विजय मांजरे हे थोडक्यात बचावले मात्र, ट्रॅक्टर चालकांनी तिथून पळ काढला. त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सुरज नागमोते, विनोद पवार व मयूर भातकुलकर या तीन वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीसाठा झाला आहे. परंतु अनेक रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया रेतीची चोरी करताना दिसत आहेत.

हेही वाचा - मुख्याध्यापकांच्या पदमान्यता रद्द करण्याचे प्रकरण : शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी ठरवला अवैध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.