अमरावती : करमचंद गांधी नव्हे तर एक मुस्लिम जमीनदारच मोहनदासचा खरा बाप आहे, असे धक्कादायक विधान संभाजी भिंडे यांनी सभेत केले होते. त्यांच्या खळबळजनक वक्तव्याची दखल घेत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. तसेच विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात लावून धरला होता. काँग्रेस तर्फे काल दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आज संभाजी भिडे यांच्याविरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी, काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देत केली होती.
काँग्रेसने दाखल केली तक्रार : संभाजी भिडे यांची गुरूवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम् येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांनी राष्ट्रपिता व अंहिसेचे पुजारी म्हणुन परिचित महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टिका केली. व त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. त्यावेळी भिडे म्हणाले की, मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.
अटकेची काँग्रेसने केली मागणी : या संदर्भात तक्रार दाखल करताना महाराष्ट्र प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखल्या आहेत. संभाजी भिडे यांच्या वतीने, यासंदर्भात आपल्याकडे काही पुरावा आहे का? असे उलट पोलिसांनी आम्हाला विचारले असल्याचे नंदकिशोर कुयटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आंबेडकरी संघटनांनी भिडेंची सभा उधळण्याचा प्रयत्न : वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले संभाजी भिडे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काल केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो महापुरुष शहीद झाले. मात्र मनोहर कुलकर्णी स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून दुखवटा पाळण्याचे सांगतात. राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत महामानवांचा, महिलांचा वारंवार अपमान करून संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखवतात. त्यामुळे समाजात भांडणे लावणाऱ्या संभाजी भिडे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत काल आंबेडकरी संघटनांनी संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.
यवतमाळ मध्ये भिडे यांचे पोस्टर फाडले : आज सकाळी 11 वाजता यवतमाळ येथे संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेससह आंबेडकरी संघटनाने त्यांच्या सभेला विरोध करत शहरभर लावलेले पोस्टर फाडले आहेत.
हेही वाचा -