ETV Bharat / state

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न - convocation ceremony

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजीत इंगळे यांनी सहा सुवर्ण आणि एक रोख पारितोषिक पटकाविले आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात थाटात आयोजित दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांच्या उपस्थितीत अभिजीत इंगळे याला सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

amaravati
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपालांच्या उपस्थितित संपन्न
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:20 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत सोहळा शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थित पार पडला. या सोहळ्यात सर्वाधिक सहा सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजीत इंगळे याचा गौरव करण्यात आला.

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपालांच्या उपस्थितित संपन्न

हेही वाचा - #Video: सर्पमित्राकडून नागाला जीवदान; तोंडात हात घालून काढले गिळलेले कापड

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजीत इंगळे यांनी सहा सुवर्ण आणि एक रोख पारितोषिक पटकाविले आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात थाटात आयोजित दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांच्या उपस्थितीत अभिजीत इंगळे याला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. अभिजीत विद्यापीठाच्या मराठी विभागातून वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, कवितालेखन या स्पर्धांमध्ये सतत अव्वल राहिला आहे. आपल्या यशाबाबत बोलताना अभिजीत म्हणाला, की माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ. मोनाची चिमटे, यांच्यासह प्राध्यापक डॉ. मनोज तायडे, प्राध्यापक डॉ. माधव कुटवाड प्राध्यापक डॉ. हेमंत खडके आणि प्राध्यापक डॉ. प्रणव कोलते यांना असल्याचे म्हणले आहे. विद्यापीठातून सर्वाधिक सुवर्णपदक पटकावून अभिजीतने विद्यापीठाच्या मराठी विभागाचा मान वाढविल्याची प्रतिक्रिया मराठी विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी दिली.

हेही वाचा - अमरावतीत राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेची जोरदार सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

या कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्यासह सर्व शाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते.

Intro:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा दीक्षांत सोहळा आज महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोशियारी आणि केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थित थाटात पार पडला. या सोहळ्यात विद्यापीठातून सर्वाधिक सहा सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजीत इंगळे याचा गौरव करण्यात आला.

Body:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजीत इंगळे यांनी सहा सुवर्ण आणि एक रोख पारितोषिक पटकाविले आहे विद्यापीठाच्या प्रांगणात थाटात आयोजित दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांच्या उपस्थितीत अभिजीत इंगळे यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले यावेळी सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.
कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला प्र.कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख यांच्यासह सर्व शाखेचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते.
अभिजीत इंगळे हा विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी विभागातून वक्तृत्व स्पर्धा वाद विवाद स्पर्धा कवितालेखन आधीच स्पर्धांमध्ये सतत अव्वल राहिला आहे मराठी साहित्याबरोबरच समाजशास्त्र, राज्यशास्त्र ,स्त्रीवाद आदी विषयांमध्ये त्याला रुची व गती देखील आहे आपल्या यशाबाबत बोलताना अभिजीत इंगळे म्हणाला माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ. मोनाची चिमटे, यांच्यासह प्राध्यापक डॉ. मनोज तायडे, प्राध्यापक डॉ. माधव कुटवाड प्राध्यापक डॉ. हेमंत खडके आणि प्राध्यापक डॉ. प्रणव कोलते यांना असल्याचे म्हणले आहे.
विद्यापीठातून सर्वाधिक सुवर्णपदक पटकावून अभिजीत इंगळे यांनी विद्यापीठाच्या मराठी विभागाचा मान वाढविला असल्याची प्रतिक्रिया मराठी विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.