ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांना मदत मागूनही दुर्लक्ष केल्याने दीपाली चव्हाणचा बळी, रूपाली चाकणकर यांचा आरोप - मेळघाट लेटेस्ट न्यूज

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर अमरावती पोलिसांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

RFO Deepali Chavan suicide, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, naneet rana letest news
चाकणकर-राणा
author img

By

Published : Mar 26, 2021, 6:12 PM IST

Updated : Mar 26, 2021, 7:07 PM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री ८ च्या दरम्यान राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना जबाबदार धरले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर अमरावती पोलिसांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाल्या चाकणकर -

रुपाली चाकणकर यांनी लिहिले आहे, की खासदार नवनीत राणा यांच्याकडे मदत मागूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने दीपाली चव्हाण या महिलेचा बळी गेला आहे. राणा या एक महिला खासदार असून आपल्याकडे मदत मागणाऱ्या एका महिलेला जर आपण न्याय देऊ शकत नसाल तर ही खरोखरच घृणास्पद बाब आहे, असही रूपाली चाकणकर म्हणाल्या. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

खासदार नवनीत राणांनी मदत मागूनही दुर्लक्ष केल्याने दिपाली चव्हाणचा बळी गेल्याचा रूपाली चाकणकर यांचा आरोप..

दीपाली चव्हाण यांनी नवनीत राणांना प्रकाराची माहिती दिल्याचे समोर -

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, गावकरी माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहेत, असे मी शिवकुमार यांनी सांगितल्यानंतर मी स्वतःच एसपीला सांगून तुझ्यावर अॅट्रोसिटी लावणार असल्याचे म्हणाले. चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर तुला कळेल, अशी धमकीही शिवकुमार यांनी दिली होती. या प्रकारची रेकॉर्डिंग मी नवनीत राणांना ऐकवली असल्याचे दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. अ‌ॅट्रोसिटी प्रकरणात जामीन न मिळाल्याने मी सुटीवर होते, हे सर्वांना माहीत होते, असेदेखील दीपाली यांनी सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे.

RFO Deepali Chavan suicide, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, naneet rana letest news
मृत दीपाली चव्हाण

काय म्हणाल्या खासदार नवनीत राणा -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी व उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. तर माझ्याकडे मृत दीपाली आली होती तिने मला घडलेला प्रकार व रेकॉर्डिंग ऐकवली होती. त्यानंतर मी रेड्डी यांच्याशी बोलून दीपाली चव्हाणची बदली करण्याची मागणी केली होती. तरीसुद्धा यावर दुर्लक्ष केल्या गेले, महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ केला गेला. तसेच आमदार रवी राणा यांनीसुद्धा वनमंत्री यांना फोन करून हा प्रकार सांगितला होता, असा दावा नवनीत राना यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवकुमार अटकेत

Last Updated : Mar 26, 2021, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.