ETV Bharat / state

चिखलदरा येथे 70 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त; दोघांना अटक

author img

By

Published : Apr 19, 2021, 12:39 PM IST

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे पोलिसांनी एका घरात धाड टाकून सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली. या प्रकरणी रामकिशोर बेलसरे आणि साहेबराव बेलसरे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Amravati
Amravati

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा येथे पोलिसांनी एका घरात धाड टाकून सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली. या प्रकरणी रामकिशोर बेलसरे आणि साहेबराव बेलसरे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

माहिती मिळताच पोलिसांनी टाकली धाड-

चिखलदरापासून जवळच असलेल्या मांजर कापडी गावात अवैध गुटखा साठा असल्याची माहिती चिखलदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाढावे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर, जमादार ईश्वर जांबेकर तसेच पोलीस शिपायांसह बेलसरे याच्या घरावर धाड टाकली. येथे सहा पोत्यांमध्ये अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

मेळघाटसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सर्वत्र अवैध गुटखा विक्री होत आहे. याविरोधात प्रशासनाच्यावतीने कुठलीही कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होते. मेळघाटात आदिवासी महिलांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने लहान मुलेही गुटख्याच्या आधीन झालेली दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.