ETV Bharat / state

Research On Sun Layers: भारताचं यान सुर्यावर पोहोचण्यापूर्वीच महाराष्ट्रातील शास्त्रज्ञानं लावला मोठा शोध, जाणून घ्या सविस्तर माहिती

Research On Sun Layers अमरावतीचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी सूर्याभोवती असणाऱ्या एकूण चार लेअर्सचा सूक्ष्म अभ्यास केला. या माध्यमातून त्यांनी मुख्य चार लेयर्स व आणखी 11 सबलेयर्स शोधल्याचा दावा केला आहे. लवकर इस्त्रोचे 'आदित्य L1' हे यान आकाशात झेपावणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. इंगोले यांनी इस्त्रोला त्यांच्या संशोधनाबद्दल पत्राद्वारे माहिती कळविली आहे. (Dr V T Ingole) (Four main layers of sun) (11 Sublayers around sun) (Aditya L1) (ISRO) (Research On Sun Layers) (Amravati Scientist Claims)

Research On Sun Layers
सूर्याविषयी संशोधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 8:18 PM IST

सूर्याच्या अकरा सबलेयर्स शोधण्याचा डॉ. व्ही. टी. इंगोले यांचा दावा

अमरावती: Research On Sun Layers भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता लवकरच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य L1' हे यान लवकरच झेपावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सूर्याभोवती असणाऱ्या एकूण चार लेअर्सचा अमरावतीचे शास्त्रज्ञ डॉ व्ही टी इंगोले यांनी सूक्ष्म अभ्यास केला. यामाध्यामातून त्यांनी मुख्य चार लेयर्स व आणखी 11 सबलेयर्स शोधल्या असल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील माहिती 'आदित्य L1' मोहिमेत ही माहिती उपयुक्त ठरेल असा विश्वासदेखील डॉ. इंगोले यांनी 'ई टिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे. (Dr V T Ingole) (Four main layers of sun) (11 Sublayers around sun) (Aditya L1) (ISRO) (Research On Sun Layers) (Amravati Scientist Claims)

अशी आहे लेअर्सची रचना: सूर्य हा एक तप्त गोळा असून त्यातून प्रकाश आणि उष्णता बाहेर पडतो. त्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला ऊर्जा मिळते, अशी साधी माहिती सर्वांनाच आहे. आतापर्यंत सूर्या संदर्भात झालेल्या संशोधनामध्ये सूर्य हा तप्त वितळलेल्या रसाने बनलेला असून त्यावर एक प्रकाशमानाची लेयर आहे. त्या लेयरला फोटोसपियर म्हणतात. या लेअर मधूनच आपल्याला दिसणारे सप्तरंगी प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. यानंतर प्रोमोस्पियर ही दुसरी लेयर असून त्यामधून अल्ट्राव्हायोलेट किरण निघतात. त्यानंतर ट्रान्झिशन रिजन नावाची तिसरी लेयर असून त्यामधून अतिनिल किरण म्हणजेच हाय अल्ट्रा वायोलेशन बाहेर पडतात. शेवटी कोरोना नावाची सर्वांत जड लेअर आहे. या कोरोना लेयर संदर्भात ढोबळमानाने माहिती उपलब्ध नाही. मात्र या कोरोना लेयर्सच्या तीन सब लेयर्सची माहिती यापूर्वीच जगाला कळली होती. आता आमच्या अभ्यासात नव्याने 11 सब लेयर्स आढळले असल्याचे डॉ व्ही. टी. इंगोले म्हणाले.

'या' सबलेयर्सचा अभ्यास: सूर्यासंदर्भात आजवर झालेल्या अभ्यासात फोटोसपियर, प्रोमोस्पियर, ट्रान्झिशन रिजन आणि कोरोना या सूर्याभोवती असणाऱ्या चार लेअर्स सर्वांना माहिती होत्या. मात्र गेल्या वेळी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी आमच्याकडे उपलबध सर्व उपकरणांच्या सहाय्याने सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले. सुर्यग्रहण लागण्यापूर्वी तसेच सूर्यग्रहण लागल्यावर आणि ते सुटल्यानंतर सूर्यप्रकाशातील अति सूक्ष्म बदल आम्ही आमच्या उपकरणात संचित (स्टोअर) केलेत. त्यानंतर त्याचा अभ्यास करून विश्लेषण केले. सूर्याच्या सर्व लेअरच्या जाडीची गणित आणि उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळवून पाहिली असता आम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेत. क्रोमोस्फियर लेअरच्या आत तीन सबलेयर्स आम्हाला आढळून आल्या. तसेच ट्रान्झिशन रीजन या लेयरमध्ये एकूण आठ सबलेयर्स देखील आढळून आलेत. सूर्या संदर्भात ही माहिती अतिशय नवीन आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीची दखल इस्त्रो नक्कीच घेईल, अशी आशा डॉ व्ही टी इंगोले यांनी व्यक्त केली.

पृथ्वीवरून आपल्याला काही तेजोवलय अर्थात कोरोना लेयर दिसते. ती पाच हजार किलोमीटर रुंद पसरली आहे. त्यानंतर त्याच्यापुढे सूर्यप्रकाश जात नाही- डॉ व्ही. टी. इंगोले

लेयर्सची अशी आहे रुंदी: सूर्याच्या सर्व मुख्य चारही लेयर्समध्ये प्रकाशमानात बदल होताना दिसतो. सूर्याच्या अगदी जवळ असणारी फोटोस्पियर ही लेयर सुमारे 400 ते 500 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. त्यानंतर सुमारे साडेसातशे किलोमीटरपर्यंत लेअर मोठी पोकळी अर्थात डेड झोन आहे. त्यानंतर क्रोमोस्फियर ही लेयर असून ही लेयर सुमारे अडीच हजार ते तीन हजार किलोमीटर रुंद आहे. त्यानंतर ट्रान्झिशन रीजन ही सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार किलोमीटर रुंद अशी लेयर आहे. यानंतर पुन्हा डेड झोन अर्थात पाचशे किलोमीटर रुंद मोठी पोकळी आहे.

हेही वाचा:

  1. ISROs latest update : प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील सल्फरसह शोधले इतर घटक; चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा प्रथमच इन-सीटू अभ्यास...
  2. International Day Against Nuclear Tests २०२३ : आण्विक चाचण्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस 2023; जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि परिणाम
  3. ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.