अमरावती - कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शासनाने घातलेले निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात चार महिन्यांपासून बंद असणारे अमरावती शहर आजपासून पूर्णतः उघडले आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण शहर खुले ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिल्याने आज शहर सकाळपासूनच गजबजले होते.
8 वाजताच उघडली दुकाने -
पश्चिम विदर्भातील कपड्यांची मोठी बाजारपेठ असणाऱ्या अमरावती शहरातील कापड मार्केट सकाळी 8 वाजतापसूनच उघडले. यासह सर्व प्रकारची दुकाने 8 वाजतापसूनच उघडणे सुरू झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडल्याने शहरात कोरोनाकाळापूर्वीचे चैतन्य पाहायला मिळाले.
खवय्यांची उसळली गर्दी -
अमरावती शहरात प्रसिद्ध असणाऱ्या सांभारवादी, गिलावडा, मुगाचे भजे खाणाऱ्या खवय्यांची गर्दी सकाळीच जयस्तंभ चौक, इर्विन चौक, रेल्वे स्थानक चौक, जवाहरगेत परिसरात लागणाऱ्या गाड्यांवर गर्दी उसळली होती. शहरातील सर्व रेस्टॉरेंट, हॉटेल, खानावळ यांना 50 टक्के आसन क्षमतेसह सकळी 7 ते 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याने ही सर्व खाण्याची ठिकाणांवरही अमरावतीकर सकाळीच तुटून पडले.
मध्यवर्ती बस स्थानक झाले सुरू -
दोन महिन्यांपासून केवळ लांब पल्ल्याच्या एक दोन गाड्या अमरावती बसस्थानकावर येत होत्या. आज मात्र सर्व प्रकरच्या गाड्या धावायला लागल्या. बस स्थाकवर सकल्पासूनच प्रवाशांची गर्दी झालेली दिसली. तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थित करता येणार आहे. यासाठी मात्र प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अंत्यविधीसाठी 20 जणांच्या उपस्थितीलाच परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा - अबब ! एका नूरजहां आंब्याची किंमत 1000 रुपये; झाडावरून काढण्यापूर्वीच बुकींग