अमरावती - आमदार अब्दुल सत्तार यांना माझ्या विरोधात उभे राहण्यास काँग्रेसने सांगितले आहे. मात्र, ते उभा राहण्यास तयार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रहावसाहेब दानवे यांनी केले. अर्जुन खोतकर आणि सत्तार यांची भेट झाली असली तरी खोतकर हे काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचेही दानवे म्हणाले.
आज अमरावतीमध्ये भाजप-सेना युतीची पहिली जाहीर सभा झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी दानवे बोलत होते. राज्यातल्या ६ विभागामध्ये आम्ही जाऊन आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. अहमगनगरमध्ये सुजय विखेंना तिकिट दिल्यास ते निवडणूक येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. उमेदवारीवरुन त्यांच्यात घोळ आहे. बच्चू कडूंचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे दानवे म्हणाले.