अमरावती - मी आजारी पडलो तर डॉक्टरांकडून नाही तर त्या डॉक्टरच्या कंपाउंडरकडून उपचार घेतो. कारण डॉक्टर पेक्षा त्या कंपाउंडरला जास्त कळतं, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. आता या विषयावरुन भाजपने राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. अमरावतीत माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडें यांनी मनोविकार तज्ञ डॉक्टरांच्या तीन कंपाउंडरचा सत्कार करून, त्या कंपाउंडरनीं संजय राऊत यांच्यावर उपचार करावे, अशी मागणी केली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांना डब्लूएचओ संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी डब्लूएचओला काय कळत असे उत्तर दिले. या सोबतच त्यांनी सांगितले की, मी केव्हाच डॉक्टरकडून उपचार घेत नाही तर त्या डॉक्टरच्या कंपाउंडरकडून उपचार घेतो. कारण डॉक्टरपेक्षा त्या कंपाउंडरला जास्त कळतं, असे सांगितले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर अनेक डॉक्टरांना नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात भाजपने देखील राऊत यांना लक्ष केले. अमरावतीमध्ये डॉ. अनिल बोंडें यांनी राऊत यांच्या वक्तव्याच निषेध केला. तसेच त्यांनी राऊत यांच्यावर मनोविकार तज्ञ डॉक्टरांच्या कंपाउंडरने उपचार करावे, अशी मागणी केली.
हेही वाचा - आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाने मी मरणाच्या दारातून परतले- खासदार नवनीत राणा
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: ...अखेर बगाजी सागर धरणावर पोलीस बंदोबस्त तैनात