ETV Bharat / state

गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरूवात

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश- विदेशातील लाखो गुरुदेव भक्तांची उपस्थिती असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटींनुसार मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित पुण्यतिथी महोत्सव पार पडत आहे. पहाटे महासमाधीवर तीर्थ स्थापना व सामुदायिक ध्यानाने महोत्सवाला सुरूवात झाली.

गुरुकुंज मोझरी
गुरुकुंज मोझरी
author img

By

Published : Oct 30, 2020, 8:59 AM IST

अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज (शुक्रवार) ५२ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे साडे चार वाजता तीर्थ स्थापनेने महोत्सवाला प्रारंभ झाला. मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित महोत्सव पार पडत आहे. दरम्यान, पुण्यतिथी महोत्सवाला भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन गुरूदेव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरूवात

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश- विदेशातील लाखो गुरुदेव भक्तांची उपस्थिती असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटींनुसार मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित पुण्यतिथी महोत्सव पार पडत आहे. पहाटे महासमाधीवर तीर्थ स्थापना व सामुदायिक ध्यानाने महोत्सवाला सुरूवात झाली. आजपासून सुरू झालेला या पुण्यतिथी महोत्सवात धार्मिक, सामाजिक आदी कार्यक्रम पार पडणार आहे. सोशल मिडीयावर कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. तर येत्या सहा तारखेला महाकाल्याने महोत्सवाचा समारोप होईल. तसेच ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी तुकडोजी महारांजाना मौन श्रध्दांजली वाहिली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.