ETV Bharat / state

'झुंड'मधील सहकलाकार ते यशस्वी रॅपर, अमरावतीच्या सौरभ अभ्यंकरचं 'असं' बदललं जीवन

Rapper Saurabh Abhyankar : आजकाल रॅप या संगीताच्या प्रकारला खूप पसंती दिली जाते. या रॅपमुळं अनेकांचं जीवन बदललंय. अमरावतीच्या सौरभ अभ्यंकरचंही आयुष्य या रॅपमुळं पूर्ण बदलल्याचं त्यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना सांगितलं.

Rapper Saurabh Abhyankar
Rapper Saurabh Abhyankar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:01 AM IST

Updated : Jan 3, 2024, 9:08 AM IST

रॅपमुळे बदलले आयुष्य

अमरावती Rapper Saurabh Abhyankar : आधी आमच्या फॅशन शोची तिकीटं विकून दे, त्यानंतरच तुला पाच मिनिटांसाठी परफॉर्म करू देतो, अशी रॅपर सौरभ अभ्यंकरला अट घातली जायची. त्यानंतर केवळ मिळणाऱ्या पाच मिनिटात रॅप सादर करत होतो, असं सांगणाऱ्या अमरावतीच्या रॅपर सौरभ अभ्यंकरचं जीवन एमटीव्ही हसल 3.0 च्या पुरस्कारानंतर पार बदललंय.

तीस हजार जणांच्या यादीतून सिलेक्शन : मुळचा अमरावतीचा असलेल्या सौरभ अभ्यंकरनं 12 वी नंतर पॉलिटेक्निक केलं. परंतु, अभ्यासापेक्षा सौरभला रॅप आणि संगीतामध्ये अधिक आवड असल्यानं त्यानं 2016 मध्येच मुंबईची वाट धरली. तेथील रॅपरला भेटून चर्चा करणं, त्यांचं राहणीमान पाहणं आणि व्हिडिओ काढणं याची प्रचंड आवड होती. त्यातूनच बऱ्याच ठिकाणी ऑडिशन देत होतो, परंतु काहीच हाती लागत नसल्याचं सौरभ सांगतो. परंतु, अशातच मला एक दिवस एमटीव्हीमधून फोन कॉल आला. तीस हजार जणांच्या यादीतून माझं 'हसल 3.0' साठी सेलेक्शन झालं होतं. सीझन 3 चा प्रीमियर 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. विक्ड सनी आणि सुपर माणिक यांनी सूत्रसंचालन केलेल्या या शोला दुसऱ्यांदा बादशाह आणि चार स्क्वॉड बॉस ईपीआर, डिनो जेम्स, डी एमसी आणि इक्का यांनी परीक्षक म्हणून काम केल्याचं सौरभनं सांगितलं. दिल्लीतील उदय पांधी 'एमटीव्ही हसल 3.0' रॅप रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजन शोचा विजेता आहे. या शोमध्ये सौरभनं '100RBH ओजी हसलर ट्रॉफी' जिंकली होती.

अमिताभ बच्चन सोबत केली भूमिका : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमामध्ये सौरभनं सहकलाकार म्हणून भूमिका केली. त्यासोबतच 2019 मधील झोया अख्तरनं दिग्दर्शित केलेल्या गल्ली बॉय या चित्रपटात इंडिया 91 हे रॅप सादर केलं असल्याची माहिती सौरभनं 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना दिली. सुरुवातीला विद्रोही असलेलं रॅप आता मात्र व्यावसायिक स्वरुपाचं झालंय. प्रेम कथा असो वा सामाजिक आशयाचा चित्रपट असो त्यामध्ये रॅप टाकले जातं. त्यामुळं रॅपला एक ग्लॅमर आल्याचं सौरभ सांगतो.

काय आहे रॅप प्रकार? : रॅप हा संगीताचा एक प्रकार आहे. यात शब्द गायले जात नाहीत. परंतु, शब्द वेगवान आणि लयबद्ध पद्धतीनं बोलले जातात. काही लोकांसाठी, रॅप-हिप-हॉप पिढीचं संगीत एवढाच आवाज आहे. न्यूयॉर्क शहरातील आफ्रिकन अमेरिकन समुदायांमध्ये उगम झालेला रॅप, शुगर हिल गँगच्या “रॅपर्स डिलाइट” 1979 मध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाला. हरजीत सिंग "बाबा" सहगल, एक भारतीय रॅपर आहे. पहिला भारतीय रॅपर म्हणून त्याची सर्वत्र प्रशंसा केली जाते.

हेही वाचा :

  1. बांबूनं आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती
  2. बाप रे बाप! अर्धाकोटी किंमतीचा रेडा 'सुल्तान'ने वेधलं अमरावतीकरांचं लक्ष

Last Updated : Jan 3, 2024, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.