अमरावती - पदवीधर मतदार संघाची निवडणूक ( Graduate Constituency Election 2023 ) 30 जानेवारीला होणार असून या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा भाजपच्या वतीने डॉ रणजीत पाटील ( Ranjeet Patil Will File Application ) भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत 11 जानेवारीला डॉक्टर रणजीत पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे भाजपचे विदर्भ संघटन मंत्री चैनसुख संचेती यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
11 जानेवारीला पदवीधर मेळावा 11 जानेवारीला पोटे महाविद्यालय संकुलाच्या भव्य सभागृहात सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Presence ) आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp State President Chandrashekhar Bawankule ) यांच्या उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रमुख नेते पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यानंतर डॉक्टर रणजीत पाटील ( Ranjeet Patil Will File Application For Graduate Constituency ) हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दोन लाखांहून अधिक मतदार अमरावती पदवीधर मतदार संघात अमरावती अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील 56 तालुके आणि तीन विधानसभा मतदार संघ मिळून एकूण दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. यापैकी दीड लाख मतदारांची नोंदणी ही भाजपने केली असल्याचा दावा चैनसुख संचेती ( Chainsukh Madanlal Sancheti ) यांनी केला.
निवडणूक जिंकण्याचा विश्वास अमरावती पदवीधर मतदार संघाची ( Amravati Graduate Constituency Election ) निवडणूक भाजपचे उमेदवार डॉक्टर पाटील हे निश्चितपणे जिंकणार असा विश्वास चैनसुख संचेती यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी देखील पदवीधरांसाठी गत बारा वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे आपण विजयी होऊ असा विश्वास आहे. तरी ही एक लढाई असून ही निवडणूक गांभीर्याने लढली जाईल, असे सांगितले.