अमरावती : 'जी २०' समूहाचे शिखर संमेलन भारतात पहिल्यांदा होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. 20 देशांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी जोडलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे स्वागतासाठी माधुरी सुदा आणि शुभम क्लासेस यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. माधुरी सुदा यांनी रांगोळीच्या माध्यमातून आतापर्यंत दहापेक्षा अधिक विश्व रेकॉर्ड केले आहेत. 'जी २०' लोगोची रांगोळी साकारण्याकरिता त्यांना सारिका वाकडे, रूपाली गायकवाड, गंगोत्री गगन, काजल साबू ,पंकज देशपांडे, हरिओम साबळे, शुभम गावंडे ,सागर विश्वकर्मा यांचे लाभल्याचे माधुरी सुधा यांनी सांगितले.
या मान्यवरांची उपस्थिती : रांगोळीचे सगळे व्यवस्थापन प्रेमचंद अग्रवाल, गणगौर यांनी केले. भाजप शहराध्यक्ष किरण पातुरकर यांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसेवक मिलिंद बांबल, अलका सप्रे, श्रद्धा गेहलोद, पुष्पा लांडगे तसेच शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व एचएससी ऑफिसरचे प्राचार्य विशाल भोयर, पर्यवेक्षक आकाश भोयर, डॉ. अमोल भोयर यावेळी उपस्थित होते.
'जी २०' मध्ये कोणते देश? 'जी २०' मध्ये भारत, इंडोनेशिया, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. 'जी २०' ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.
पुण्यातही 'जी २०'च्या आयोजनाचे स्वागत : 'जी २०' प्रतिनिधींसाठी पुण्यात 17 जानेवारी, 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण : यावेळी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी 'सागा ऑफ मराठा एम्पायर' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या कलांचे सादरीकरण केले. प्रारंभी शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासोबतच तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले. शिवराज्याभिषेक गीतांनी कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुण्यांना यात सामील होण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील सर्व कलाकारांना दाद देत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला. तर काहींनी टाळ वाजवून आनंद व्यक्त केला.
हेही वाचा : Anant Radhika Engagement Video : अनंत अंबानी-राधिकाचा एंगेजमेंट सोहळा; पाहा खास व्हिडिओ