अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे भव्य मिरवणुकीचा पंचवटी चौकातून इर्विन चौकात आले असताना भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने इरविन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला राळा दाम्पत्याच्या अभिवादनास विरोध करताच तणाव निर्माण झाला.
भीम ब्रिगेड कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अभिवादन करू नये, अशी मागणी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गोंधळ घालणाऱ्या भीम ब्रिगेड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी भीम ब्रिगेड संघटनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी राणा दाम्पत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी केली.
राणा दाम्पत्यांनी केले अभिवादन - इरविन चौक येथे खुल्या जीपमधून मिरवणूक काढत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी राणा दाम्पत्याने जय भीमचा नारा दिला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची मिरवणूक शहरात निघाली असून संपूर्ण शहरात मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजकमल चौक येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य जल्लोष केला जाणार आहे.
हेही वाचा - Railway General Ticket Closed : रेल्वेचे जनरल तिकीट बंदच; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून जबर दंड वसुलीही