ETV Bharat / state

Rana Couple Diwali Celebration : राणादांपत्याकडून समाजातील वंचितांना दिवाळी फराळ, कपड्यांचे वाटप - Rana couple celebrated Diwali

अमरावतीत राणा दांपत्याने वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी केली. खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा या दांपत्याने आज दिवाळीच्या पर्वावर आपल्या शंकर नगर येथील निवासस्थानी समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी ( Rana couple celebrated Diwali with underprivileged ) केली.

Rana Couple Diwali Celebration
वंचितांना दिवाळी फराळ
author img

By

Published : Oct 24, 2022, 8:11 PM IST

अमरावती : अमरावतीत राणा दांपत्याने वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी केली. खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा या दांपत्याने आज दिवाळीच्या पर्वावर आपल्या शंकर नगर येथील निवासस्थानी समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी ( Rana couple celebrated Diwali with underprivileged ) केली.

व्हिडिओ

वंचितांचा केला सन्मान : समाजातील अंध, दिव्यांग, कुष्ठरोगी, निराधार, शेतकरी, विधवा, माजी सैनिक, अनाथ बालके, परितक्त्या महिला आदी वंचित घटकातील व्यक्तींचा राणादांपत्याने दिवाळीच्या पर्वावर सन्मान केला. यावेळी या सर्व वंचितांना दिवाळीनिमित्त किराणा किट, फराळाचे साहित्य, नवीन कपडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते वितरित करण्यात ( Clothes Distribution On Diwali ) आले.

उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा : बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हे समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरा करून, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करीत आहेत, त्याला माझ्या अनंत शुभेच्छा असल्याचा संदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी यावेळी भ्रमणाध्वनीद्वारे दिल्या. आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हा संदेश यावेळी मोबाईलचा स्पीकर ऑन करून उपस्थित सर्वांनाच ऐकविला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.