ETV Bharat / state

मेळघाटातील धारणी तालुक्यात वाघिणीचा धुमाकूळ; तीन शेळ्यांची शिकार, आदिवासी बांधव दहशतीत - e one tiger

ई वन वाघीण धारणी मुख्यालयापासून अवघ्या १५ किमीवरील रभांग गावातील शिवारात दिसल्यामुळे या परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे.

पहारा देताना गावकरी
author img

By

Published : Jul 19, 2019, 10:38 PM IST

अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यात ई वन वाघीण दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघिणीने आता पर्यंत अनेक जणांना जखमी केल्यामुळे तिला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी येथील आदिवासी बांधव आणि गावकरी करत आहे.

ई वन वाघिणीबाबत माहिती देताना वनविभागाचे अधिकारी

मेळघाटातील डोलार जंगलात २३ जूनला नागपूरमधील ब्रम्हपुरीवरुन ई वन वाघीण आणली आहे. ही वाघीण धारणी मुख्यालयापासून अवघ्या १५ किमीवरील रभांग गावातील शिवारात दिसल्यामुळे या परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. एका गुराख्याला अचानक १० मीटरवर वाघीण दिसली. यावेळी वाघिणीने ३ शेळ्यांवर हल्ला करत एका शेळीला जंगलाकडे नेले. घटना घडत असताना वन विभागाचे ८ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रे नव्हती. त्यामुळे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी वन विभागास फटकार लावत त्वरित रेस्क्यू करण्याबाबत निर्देश दिले. तसेच घटनेस गांभीर्याने घेवून लोकांच्या सुरक्षतेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.

वनविभागाने २३ जूनला या वाघिणीला डोलारच्या जंगलात सोडले होते. या वाघिणीने पहिल्यांदा २ जुलै केकदा येथे ललिता डावर या महिलेवर, कवडाझिरी येथे म्हैशीवर, गोलाई येथे रखवालदार आणि आज रभांग गावात तीन शेळ्यांवर हल्ला केला. मात्र, तरी पण वनविभागाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वनविभागाने मेळघाट सोडून एकही रॅपिड एक्शन फोर्स किंवा रेस्क्यू टिम बोलवून वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे भविष्यात जर कोणतीही जीवित हानी झाली तर याला वनविभाग जबाबदार राहणार, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

Intro:मेळघाटातील धारणी तालुक्यात ईवन वाघिणीचा धुमाकूळ

तिन शेळ्यांची शिकार,आदिवासी बांधव दहशतीत

अमरावती अँकर
मेळघाटातील डोलार जंगलात २३ जुन ला नागपुर येथील ब्रम्हपुरीवरुन आणलेली ई वन वाघीन आता धारणी मुख्यालयापासुन अवघ्या १५ किमी वरील रभांग गाव शिवारात पदार्पण केल्याची माहीती मिळताच एकच खळबळ उडाली असुन रभांग, घोदरा, टिटंबा,सावर्या व कवडाझिरी गावात भयभित वातावरण निर्माण झाले आहे.
एका गुराख्याला अचाणक १० मिटरवर वाघीण दिसली व वाघीन ने तिन शेऴ्यांवर हल्ला करत एका शेळीला जंगलाकडे नेले. वन विभागाकडे कोणतेही सुरक्षताबाबत वेपन दिसुन आले नाही. वन विभागाचे केवळ ८ कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते. माजी आमदार राजकुमार पटेलनी वनविभागास फटकार लावत त्वरीत रेस्क्यु करण्याबाबत निर्देश दिले व घटनेस गांभिर्याने घेवुन लोकांच्या सुरक्षतेकडे लक्ष द्यावे. आता वन विभाग या ईवन वाघीनी चे अव्हानाला कसे समोर जाणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आह

२३ जुन ला ईवन वाघीणीला डोलार च्या जंगलात सोडले होते. प्रथम केकदाखेड्यात २जुलै ललीता डावरवर प्राणघातक हल्ला, कवडाझिरी म्हैसवर हल्ला, गोलाई रखवालदार वर हल्ला व आज रभांग गावात तिन शेळ्यांवर हल्ला तरीपण वनविभागाकडुन कोणतीच गांभिर्याची हलचल करण्यात आलेली दिसुन आली नाही. वनविभागाने मेळघाटसोडुन एकही रॅपीड एक्शन फोर्स किंवा रेस्क्यु टिम बोलवुन ईवन ला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला नाही हि गंभिर बाब आहे. कोणत्याही क्षणी जिवीत हाणी ईवन वाघीणी द्वारे भविष्यात झाली तर मेळघाटात महासंग्राम टाळता येणार नाही.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.