ETV Bharat / state

अमरावतीतील येवदा येथे रामनवमी साजरी, 'रामलाडू'च्या महाप्रसादाचे वाटप

येवदा येथील कळमकर परिवार गेल्या चार पिढ्यांपासून रामलाडूचे वाटप करत आहे. पाच कडधान्यापासून बनविलेला हा लाडू रामनवमीचे खास आकर्षण असतो.

रामनवमी
author img

By

Published : Apr 14, 2019, 9:01 AM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कळमकर परिवाराच्या वतीन रामलाडूचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक उपस्थित होते.

सुनिल कळमकर रामलाडूविषयी माहिती देताना

येवदा येथील कळमकर परिवार गेल्या चार पिढ्यांपासून रामलाडूचे वाटप करत आहे. पाच कडधान्यापासून बनविलेला हा लाडू रामनवमीचे खास आकर्षण असतो. या लाडूमागे एक अख्यायिका गावकरी सांगतात. कोण्या एके काळी कारंजा लाड येथील नामदेव महाराज राम जन्मोत्सवानिमित्त येवदा येथील शिवराम कळमकर यांच्या घरी आले. त्यांनी घरोघरी जाऊन पाच कडधान्य जमा केले. या कडधान्यापासून लाडू करुन त्याचे महाप्रसाद म्हणून वाटप केले.

तेव्हापासून कळमकर परिवार ही प्रथा पाळत आहेत. त्यानंतर संपत कळमकर, रामदास कळमकर आणि आता चौथ्या पिढीत सुनिल कळमकर, नाना रामदास कळमकर, विलास कळमकर ही परंपरा पाळत आहेत. हे लाडू तयार करण्यासाठी नामदेव महाराजांचे भक्त मूर्तीजापूर जांभा, कारंजा लाड अशा अनेक गावातून महाप्रसादाचे साहित्य एकत्र करतात. यासाठी कुणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत.

Intro:अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील येवदा येथे 160 वर्षापासून रामलाडू महाप्रसादाची परंपरा कायम पाच कडधान्य तुन बनवले जातात पोस्टीक लाडु, रामनवमी निमित्त विशेष सोहळा

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील कळमकर परिवार गेल्या चार पिढ्यांपासून राम जन्मोत्सव निमित्त नामदेव महाराजांच्या कृपेने राम लाडूचा महाप्रसादाचा कार्यक्रम अविरतपणे सुरू ठेवत आहे. एकेकाळी कारंजा लाड येथील नामदेव महाराज राम जन्मोत्सवानिमित्त येवदा येथील शिवरामजी संपतराव कळमकर यांच्या घरी आले त्यांनी घरोघरी जाऊन पाच कडधान्य जमा करून त्या पाच कडधान्याचे लाडू तयार करून सर्वांना महाप्रसाद दिला तेव्हापासून त्यांच्या घराची कायापालट झाली त्यानंतर संपतराव शिवरामजी कळमकर तिसरी पिढी रामदास संपतराव कळमकर चौथ्या पिढीत सुनील रामदास कळमकर नाना रामदास कळमकर विलास रामदास कळमकर राम लाडू महाप्रसादाची परंपरा कायम ठेवत आहे हा महाप्रसाद तयार करण्याकरिता नामदेव महाराजांचे भक्त मुर्तीजापुर जांभा कारंजा लाड अश्या अनेक गावातून एकत्र येऊन कुठले पैसे न घेता स्वतः मेहनत घेऊन महाप्रसाद तयार करतात या महाप्रसादाचे आस्वाद घेणे करिता पंचक्रोशीतील लोक आवर्जून उपस्थित राहातात .
सुनील रामदास कळमकर
गेल्या 160 वर्षापासून नामदेव महाराजांच्या कृपेने राम लाडूचा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे आम्ही जिवंत असेपर्यंत हा महाप्रसादाचा कार्यक्रम अविरतपणे सुरू ठेवू महाराजांच्या कृपेने आमची सर्वांची कायापालट झालीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.