ETV Bharat / state

येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता - Damage to rabi crops due to rains Amravati

येत्या १६ व १७ फेब्रुवारीला विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या गडगटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता

author img

By

Published : Feb 14, 2021, 3:10 PM IST

अमरावती - गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवतो आहे. वेस्टर्न डिस्टबन्ससच्या प्रभावामुळे विदर्भात किमान तापमान 8 सेल्सिअस अंशांपर्यंत खाली गेले होते. परंतु आता वेस्टर्न डिस्टबन्ससचा प्रभाव कमी झालेला आहे. तसेच वारेसुद्धा आता दक्षिणेकडून वाहात आहेत. त्यामुळे विदर्भात तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान 34 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान येत्या १६ व १७ फेब्रुवारीला विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या गडगटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रातून ९०० मिटर उंचीवरून वाहत असलेले चक्राकार वारे आणि सोबतच पुर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे यामुळे विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आले. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान गहू, हरभरा यासारखी पिके काढणीस आल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता

हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता

आधीच खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, यासरखी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांची भिस्त ही रब्बी हंगामातील हरभरा गहू या पिकांवर आहे. मात्र आता हवामान खात्याकडून पावसाचा अदांज वर्तवण्यात आला असून, पाऊस झाल्यास याचा सर्वाधिक फटका हा हरभरा पिकाला बसणार आहे. तसेच गव्हाच्या पिकाला थंडी आवश्यक असते, मात्र अचानक उष्णता वाढल्यामुळे याचा फटका गव्हाला देखील बसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.