अमरावती- जिल्ह्याला आज 10 दिवसानंतर पुन्हा गारपीटचा तडाखा बसला आहे. यात अचलपूर तालुक्यातील धानोरा गावात गारपीट झाली तर तिवसा तालुक्यातही अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांसह फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट - विजेच्या कडकडाटासह गारपीट
अमरावती जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यात गहू व हरभरा पिकांना फटका बसला होता.
अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट