ETV Bharat / state

जंगलची राणी सुरू करण्याच्या हालचाली, रेल्वे प्रशासनाविरोधात 'जनआंदोलना'ची तयारी

सातपुडा पर्वतातून धावणारी मीटर गेज रेल्वे गाडीचा मार्ग ब्रॉड गेज करू नये आणि आहे तो सुद्धा बंद करावा, यासाठी वन्यजीवप्रेमींनी आंदोलन छेडले आहे.

रेल्वे मार्ग
author img

By

Published : May 24, 2019, 1:20 PM IST

अमरावती - सातपुडा पर्वतातून धावणारी जंगलाची राणी, अशी ओळख असणारी मीटर गेज रेल्वे गाडी अडीच वर्षांपासून बंद आहे. या गाडीचे रूपांतर ब्रॉडगेज करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्याने रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांच्या रक्षणासाठी ही गाडी थांबवली होती. मात्र, आता येथे ब्रॉड गेज रेल्वे मार्ग होणार आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करू नये आणि आहे तो बंद करावा यासाठी वन्यजीवप्रेमींनी आंदोलन छेडले आहे.

ब्रिटिश काळात वऱ्हाडच्या खाली दक्षिणेत हैदराबाद निजामाच्या मालकीची नांदेड-पूर्णा पर्यंतची मीटर गेज रेल्वे होती आणि उत्तरेस खांडवा-रतलाम-जयपूर रेल्वे मार्ग होता. वास्तवात हैदराबाद येथून थेट अजमेर शरीफपर्यंत पोचण्यासाठी पूर्णा, अकोला, अकोट आणि पुढे सातपुडा पर्वत रांगेतून खांडवापर्यंत मार्ग निर्माण करण्याचा मानस निझाम संस्थांचा होता. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजकालीन रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि भारतीय रेल्वे अस्तित्वात आली. त्यानंतर उत्तर भारताला अगदी कमी अंतरात दक्षिणेशी जोडणारा खांडवा-अकोला या सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातून जाणारा मीटर गेज रेल्वे मार्ग निर्माण झाला. १९५५ साली सुरू झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम अवघ्या ५ वर्षांत पूर्ण होऊन २ जानेवारी १९६१ साली मेळघाटातून रेल्वे गाडी धावायला लागली.

सातपुडा पर्वतातून धावणाऱ्या रेल्वे विषयी माहिती सांगताना वन्यप्रेमी

या रेल्वेने ज्यांनी प्रवास केला त्यांनी विना कठड्याचा उंच पूल ओलांडतानाचा थरारक प्रवास अनुभवला. डब्याने खेटून जाणारे दगडी कडे, खळखळ वाहणारे पाण्याचे प्रवाह, कुठे रुळांना समांतर वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि भोवतालचे घनदाट जंगल, असा हा प्रवास होता. भारतात कुठेही नाही, असा चारचा आकडा नावाने प्रसिद्ध असलेल्या उंच पहाडावर चढण्यासाठी वापरलेले तंत्र या रेल्वेमार्गावर बघावयास मिळते. मेळघाटात या मार्गावर धुळघात गावाजवळ चढावाची ८० मीटरची उंची गाठण्यासाठी रेल्वे मार्ग एका पहाडाला वळसा घालून उंचावर नेण्यात आला आहे. असे करताना रुळांना देवनागरीतील चार (४) चा आकार प्राप्त झाला आहे. हा आकडा बघण्यासाठी पर्यटक धुळघटला येतात.

चारचा आकडा ओलांडताना दमलेल्या गाडीला थोडा आराम मिळावा यासाठी धुळघात रेल्वे या स्थानकावर गाडी बराच वेळ थांबायची. या गाडीने अकोट येथून मेळघाटातील छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांना वस्तू आणता येत होत्या. अनेक किराणा दुकानदारांची माल आणण्यास ही गाडी सोयीची होती. अकोट येथील रहिवासी असणाऱ्या वन विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांना अवघ्या ९ रुपयात धुळघात पर्यंत यायला मिळायचे. अगदी हात दाखवा आणि गाडी थांबवा, अशी ही गाडी होती. आता ही गाडी बंद असल्याने धुळघात रेल्वे परिसरातील रुळ उखडले आहे, रेल्वे स्थानकही भग्नावस्थेत आहे.

अलीकडे भारतातील जवळपास सर्वच रेल्वेमार्ग ब्रॉड गेजमध्ये रुपांतरित झालेत. या मार्गावरील अकोला ते हैद्राबाद मार्ग सुद्धा ब्रॉडगेज झाला. दुसऱ्या टप्प्यात अकोला ते खंडवा हा १७६ कि. मी चा ब्रॉडगेज होणे प्रस्तावित आहे. दरम्यान, या मीटर गेज रेल्वे मार्गावरुन दिवसाला केवळ ४ गाड्या अतिशय कमी वेगात जायच्या. आता ब्रॉड गेज रेल्वे मार्ग झाला तर या मार्गावरुन २४ तासात २८ गाड्या वेगात धावणार आहेत. ५१ किमीचा मार्ग हा जंगलातून आणि ३८ किमी मार्ग अभयारण्यातून जातो. या जंगलात असणारे वाघ, बिबट्या, अस्वल, निलगाय, सांबर, चौशिंगा, चिंकारा या भागातील या प्रमुख प्राण्यांसाठी ही गाडी काळ ठरणारी आहे. यामुळे हा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करू नये आणि आहे तो सुद्धा बंद करावा यासाठी वन्यजीवप्रेमींनी आंदोलन छेडले आहे.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासनाने एकीकडे याच रेल्वे मार्गालगत असलेल्या सोमठाणा खुर्द, बरखेडा, नागरतास आणि तलई या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना ही गाडी जंगलातून नेण्याचा हट्ट सोडून जंगलाबाहेरुन जळगाव जामोद मार्गे वळवून नेल्यास ५० गावांना या गाडीचा फायदा होईल, असे वन्यजीवप्रेमी डॉ. जयंत वडतकर यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

आज मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचे काम अकोट, हिवरखेड पर्यंत पूर्ण झाले आहे. रेल्वेगाडी जंगलाबाहेरुन न्यावी यासाठी वन्यजीव प्रेमींनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. पुढे काय निर्णय होणार हे स्पष्ट नसले तरी आज मात्र जंगलची राणी वन्यजीवांच्या संरक्षणाच्या कारणामुळे ही गाडी ३१ डिसेंबर २०१६ पासून एकाच ठिकाणी उभी आहे.

Intro: ( विशेष बातमी)

सातपुडा पर्वत रांगेतून अनेक वळणे घेत लहान मोठया नाल्यांवरील पूल पार करीत हिरव्याकंच जंगलातून धावणारी जंगलाची राणी अशी ओळख असणारी मिटर गेज रेल्वे गाडी अडीच वर्षांपासून बंद झाली आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीचे रूपांतर करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्याने वन्यजीवांच्या रक्षणासाठी ही गाडी अडीच वर्षांपासून थांबली आहे.

Body:ब्रिटिश काळात वऱ्हाडच्या खाली दक्षिणेत हैदराबाद निजामाच्या मालकीची नांदेड-पूर्णा पर्यंतची मिटर गेज रेल्वे होती आणि उत्तरेस खांडवा-रतलाम- जयपूर रेल्वे मार्ग होता.वास्तवात हैद्राबाद येथून थेट अजमेर शरीफ पर्यंत पोचण्यासाठी पूर्णा, अकोला, अकोट व पुढे सातपुडा पर्वत रांगेतून खांडवा पर्यंत मार्ग निर्माण करण्याचा मानस निझाम संस्थांचा होता.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजकालीन रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि भारतीय रेल्वे अस्तित्वात आली. स्वातंतंत्र्यांनातर रेल्वेचे जाळे वाढत असताना उत्तर भारताला अगदी कमी अंतरात दक्षिणेशी जोडणारा खांडवा-अकोला हा सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातून जाणारा मिटर गेज रेल्वे मार्ग निर्माण झाला. 1955 साली सुरू झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम अवघ्या पाच वर्षात पूर्ण होऊन 2 जानेवारी 1961 रोजी मेळघाटातून रेल्वे गाडी धावायला लागली.
या रेल्वेने ज्यांनी प्रवास केला त्यांनी बिना काठड्याचा उंच पूल ओलांडतानाचा थरारक प्रवास अनुभवला. डब्याने खेटून जाणारे दगडी कडे, खळखळ वाहणारे पाण्याचे प्रवाह, कुठे रुळांना समांतर वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि भोवतालचे घनदाट जंगल असा हा प्रवास होता.
भारतात कुठेही नाही असा चारचा आकडा नावाने प्रसिद्ध असलेल्या उंच पहाडावर चढण्यासाठी वापरलेले तंत्र या रेल्वेमार्गावर बघावयास मिळते. मेळघाटात या मार्गावर धुळघात गावाजवळ चढवाची 80 मीटरची उंची गाठण्यासाठी रेल्वे मार्ग एका पहाडाला वळसा घालून उंचावर नेण्यात आला आहे. असे करताना रुळांना देवनागरीतील चार (४) चा आकार प्राप्त झाला आहे. हा आकडा बघण्यासाठी पर्यटक धुळघटला येतात.
चारचा आकडा ओलांडताना दमलेल्या गाडीला थोडा आराम मिळावा यासाठी धुळघात रेल्वे या स्थानकावर गाडी बराच वेळ थांबायची.
या गाडीने अकोट येथून मेळघाटातील छोट्या- मोठया व्यापाऱ्यांना मोचक्या प्रवास भाड्यात वस्तू आणता येत होत्या. अनेक किराणा दुकानदारांची माल आणण्यास ही गाडी सोयीची होती. अकोट येथील रहिवासी असणाऱ्या वन विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांना अवघ्या 9 रुपयात धुळघात पर्यंत यायला मिळाचे.अगदी हात दाखवा आणि गाडी थांबवा अशी ही गाडी होती. आता ही गाडी बंद असल्याने धुळघात रेल्वे पृसरतील रूळ उखडले आहे, रेल्वे स्थानकही भग्नावस्थेत आहे.
अलोकडे भारतातील जवळपास सर्वच रेल्वेमार्ग ब्रॉड गेजमध्ये रुपांतरीत झालेत. या मार्गावरील अकोला ते हैद्राबाद मार्ग सुद्धा ब्रॉडगेज झाला. दुसऱ्या टप्प्यात अकोला ते खंडवा हा 176 कि. मी चा ब्रॉडगेज होणे प्रस्तावित आहे. दरम्यान या मिटर गेज रेल्वे मार्गावरून दिवसाला केवळ चार गाड्या अतिशय कमी वेगात जायच्या. आता ब्रॉड गेज रेल्वे मार्ग झाला तर या मार्गावरून 24 तासात 28 गाड्या वेगात धावणार आहेत. 51 किमीचा मार्ग हा जंगलातून आणि 38 किमी मार्ग वान अभयारण्यातुन जातो. या जंगलात असणारे वाघ, बीबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चौशिंगा,चिंकारा या भागातील या प्रमुख प्राण्यांसाठी ही गाडी काळ ठरणारी आहे. यामुळे हा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करू नये आणि आहे तो सुद्धा बंद करावा यासाठी वन्यजीवप्रेमींनी आंदोलन छेडले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासनाने एकीकडे याच रेल्वे मार्गालगत असलेल्या सोमठाणा खुर्द, बरखेडा, नागरतास आणि तलई या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना ही गाडी जंगलातून नेण्याचा हट्ट सोडून जंगलाबाहेरून जळगाव जामोद मार्गे वाळवून नेल्यास 50 गावांना या गाडीचा फायदा होईल असे वन्यजीवप्रेमी डॉ. जयंत वडतकर' ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
आज मिटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम अकोट, हिवरखेड पर्यंत पूर्ण झाले आहे. रेल्वेगाडी जंगलाबाहेरून न्यावी यासाठी वन्यजीव प्रेमींनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. पुढे काय निर्णय होणार हे सोष्ट नसले तरी आज मात्र जंगलची राणी वन्यजीवांच्या संरक्षणाच्या कारणामुळे ही गाडी 31 डिसेंबर 2016 पासून एकाच ठिकाणी उभी आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.