अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मजुराला त्याच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले होते. शुक्रवारी रात्री त्याने एका झाडाला साडी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर अंगारे (वय 32) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
ज्ञानेश्वर हा काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे तो तेथेच अडकून पडला होता. त्यानंतर चौथ्या टप्प्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर प्रशासनाने स्वगृही पाठवले. त्यात तोही आपल्या पिंपरी गावी परतला. आरोग्य तपासणी करून त्याला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 20 मे रोजी विलगीकरणासाठी ठेवले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याने शाळेनजीक असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रात्री तो स्वतःच्या घरी जाऊन पत्नीची साडी घेऊन बाहेर आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली.
धक्कादायक : विलगीकरणात ठेवलेल्या मजुराची गळफास घेऊन आत्महत्या..... - अमरावतीत विलगीकरणातील मजुराची आत्महत्या
ज्ञानेश्वर हा काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे तो तेथेच अडकून पडला होता. त्यानंतर चौथ्या टप्प्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर प्रशासनाने स्वगृही पाठवले. त्यात तोही आपल्या पिंपरी गावी परतला. आरोग्य तपासणी करून त्याला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 20 मे रोजी विलगीकरणासाठी ठेवले होते.