ETV Bharat / state

मोदी सरकारचा प्रहार संघटनेकडून निषेध, घरांवर लावले काळे झेंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याला आज (२७ मे) सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात पर्षाच्या काळाता त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले नाही, असे म्हणत प्रहार शेतकरी संघटनेने मोदी सरकार विरोधात निषेध नोंदवला.

प्रहार संघना
प्रहार संघटना
author img

By

Published : May 26, 2021, 6:47 PM IST

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याला आज (२७ मे) सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात पर्षाच्या काळाता त्यांनी कामगार, कर्मचारी, शेतकरी यांच्यासह कोणत्याच सामान्य माणसांच्या हिताचे काम केले नाही. तर, गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाकडेही केंद्र सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या सर्व घटनांचा प्रहार संघटनेने निषेध नोंदवला.

मोदी सरकार प्रहार संघटनेकडून निषेध, घरांवर लावले काळे झेंडे

प्रहार संघटनेकडून जिल्ह्यात घरांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर, वणी बेलखेडा या गावांमध्ये प्रामुख्याने हा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, सुनील मोहोड, अतुल राऊत, योगेश पाथरे, राजेंद्र काळे, सुरेश खैरकार, देवेंद्र शेळके, अतुल शेळके, वसंत नवघरे यांच्यासह गावातील तरुण, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा - हिंगोलीच्या सोनूवर कोणालाच भरवसा नाय, तब्बल १३ नवरदेवांना फसवणारी सोनू अखेर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.