अमरावती- अअमरावती विभागातील विनाअनुदानित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून, तसेच काही महाविद्यालयात दोन वर्षांपासून वेतन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे, आता दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री साहेब आम्ही आता आत्महत्या करावी का? असा प्रश्न प्राध्यापक व कर्मचऱ्यांनी उपस्थित केला आहे.
महाविद्यालयांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने परिस्थिती बिकट
समाजकल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्तींच्या भरवशावर सर्व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यलयांचा डोलारा उभा आहे. असे असताना समाजकल्याण विभागाने मागच्या वर्षीचे शिष्यवृत्तीचे धनादेश काढले नसल्याने महाविद्यलयांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यावर्षी शिष्यवृत्तीसाठी आलेले ऑनलाइन पोर्टल अद्याप सुरू झाले नाही. अशा परिस्थितीमुळे ६ ते २७ महिने विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वेतनाविना संकटाचा सामना करीत आहेत.
म.टी.साच्या वतीने निवेदन
महाराष्ट्र टेक्निकल स्टाफ असोसिएशन अर्थात 'मटीसा'च्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, विभागीय तंत्र शिक्षण संचालक डॉ. जाधव यांना आपल्या अडचणी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही शासनाने आमच्या अडचणींची दखल घेतली नाही, अशी प्रतिक्रिया मटीसाचे अध्यक्ष डॉ. राजेश कुबडे व सदस्य प्रा. गार्ग्य आवारे यांनी दिली.
हेही वाचा- धनत्रयोदशी करा सोनेरी, अमरावतीत २४ कॅरेट सुवर्ण मिठाई, किंमत ऐकून व्हाल अवाक्