ETV Bharat / state

रेड्डी आणि शिवकुमारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; बेलदार भटका समाज संघटनेची मागणी - dipali chavan news

हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकरी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष राजू साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
author img

By

Published : Apr 6, 2021, 5:44 PM IST

अमरावती - हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकरी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष राजू साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली.

बेलदार भटका समाज संघटना
योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार...

आमचा समाज अतिशय अल्पसंख्यांक असून राज्यात आमच्या समाजाची एकूण संख्या 25 लाख आहे. आमच्या समाजातील मुलगी दीपाली चव्हाण ही अभ्यास करून मेहनतीने अधिकारी झाली होती. असे असताना अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी आणि शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही एक प्रकारची हत्त्या असून या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भादवीच्या कलम 34, 302, 306, 354, 294, 506, 109 आणि 313 अन्वये गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी..

दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणासारख्या घटना राज्यात पुन्हा घडणार नाही यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष द्यावे. या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा. दीपाली चव्हाण यांना योग्य न्याय मिळावा यासाठी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीही करण्यात आली. हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावे असेही राजू साळुंके म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.