ETV Bharat / state

भरचौकात महिलेची प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी सायकल रिक्षातून नेल्याने मृत्यू - amravati latest news

अमरावतीमधील मोर्शी येथे शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे गर्भवती महिलेचा बळी गेला आहे. रुग्णवाहिकेचा अभावामुळे महिलेचा भरचौकात प्रसुती करावी लागली आहे.

रुग्णवाहिकेअभावी मालवाहू रिक्षातून नेल्याने मृत्यू
author img

By

Published : Sep 20, 2019, 5:07 PM IST

Updated : Sep 20, 2019, 6:57 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी येथे एका गर्भवती महिलेची भर चौकात उघड्यावर प्रसुती करण्यात आली. एवढेच नाहीतर तिला प्रसुतीनंतर सायकल रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.

आईसोबत भांडण करुन घर सोडलेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

आशा परशुराम बारस्कर (35), असे मृत महिलेचे नाव आहे. ती वरुड तालुक्यातील जरुड येथील रहिवासी आहे. तिला प्रसुती कळा सुरू झाल्यामुळे वरुड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून अमरावतीला नेण्यास सांगितले. मात्र, तिला रुग्णावाहिका मिळाली नाही. शेवटी ती आणि तिचा पती एस. टी. बसने मोर्शीला गेले. प्रसुती वेदना वाढल्याने एसटी वाहकाने तिला मोर्शीच्या जयस्तंभ चौकात उतरवले. तिला प्रचंड त्रास होत होता. तेवढ्यात चौकात असलेले उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सद्स्य कमर अली लियाकत अली यांनी तत्काळ रुग्णालयातील आया कमलाबाईला जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर भररस्त्यात त्या महिलेची प्रसुती करण्यात आली. तिच्या अवहेलना एवढ्यावरच थांबल्या नाही, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी एका सायकल रिक्षात घालून तिला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला पाठवण्यात आले. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

नागपुरात १ महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या ; कारण अस्पष्ट

राज्याचे कृषी मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याच मतदार संघात ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि ढिसाळ यंत्रणेमुळे या महिलेचा बळी गेला. त्यामुळे तिचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिचे नातेवाईक करीत आहे.

Intro:पुरोगामी महाराष्ट्रात चाललय तरी काय.भर चौकात महिलेचे प्रसूती,त्यानंतर रुग्णवाहिका नसल्याने रिक्षात टाकून नेण्याची वेळ

वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेलाच मृत्यू.
---------------------------------------------------------- 
अमरावती अँकर 

एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य योजनांवर करोडो रुपये खर्च केले जातात.परन्तु  वेळेवर रुग्णवाहिका व योग्य उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले."एवढेच नाही तर तिच्या प्रसूती नंतर त्या महिलेल्या रिक्षात नेण्याची वेळ आली महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडली अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात .

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील जरूड येथील एका महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या वेदनेने ती किंकाळत होती.त्यानंतर तिला वरुड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी करून तिला अमरावती ला जायला सांगितले. रुग्णवाहीकेची गरज होती.पण रुग्णवाहिका बंद असल्याने.त्यानंतर ती आणि तिचा पती एस टी बसने मोर्शीला आले. प्रसूतीच्या कळा वाढत होत्या.अशातच माणुसकी विसरलेल्या एसटी बस चालकाने तीला मोर्शीच्या चौकात उतरून दिले आणी वेदनेने घायाळ झालेल्या त्या माउलीला लोक पाहत होते.महिला पाहत होत्या पण तिच्या वेदनेवर फुंकर घालायला कुणी पुढे सरसावत नव्हतं अशातच प्रसूतीच्या कळा वाढल्या आणि भर चौकात उघड्यावर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतरही तिच्या वेदना संपल्या नाही रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतर तिला मोर्शीच्या रुग्णालयात नेण्यासाठी एकही वाहन आले नाही ना कुठली रुग्ण वाहिका तिला प्रसूती झाल्यानंतर भर शहरातून तिला रिक्षात टाकून मोर्शीच्या रुग्णालयात नेन्यात आलं आणि तिथून तिला अमरावतीला रेफर करण्यात आलं परन्तु वाटेतच तिची प्राणजोत मालवली.ही दुर्दैवी कहाणी आहे .अमरावतीच्या वरुड तालुक्यातील जरूड या गावातील मोलमजुरी करनाऱ्या 35 वर्षीय आशा परशुराम बारस्कर या गरीब महिलेची.पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही दुर्दैवी आणि तेवढीच संताजनक घटना घडली आहे राज्याचे कृषी मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्याच मतदार संघात.डॉक्टराच्या हलगर्जीपणा मुळे ढिसाळ यंत्रणेला बळी पडलेल्या या आशा बारस्कर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईक करीत आहे.

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील जरूड येथे मजूरी करत असणारे परशुराम बारस्कर यांची पत्नी सौं आशा परशुराम बारस्कर (35) हिला प्रसूती करिता वरुड येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तिथून त्यांना अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. कुठलेही शासकीय वाहन उपलब्ध करून न दिल्याने त्यांनी एसटी महामंडळाच्या बसने अमरावती करिता प्रस्थान केले असता मोर्शीच्या जयस्तंभ चौकात गाडी पोहोचताच सदर महिलेला मोठ्या प्रमाणात प्रसूतिवेदना सुरू झाल्याने बसच्या वाहकाने त्यांना जयस्तंभ चौकात उतरवून दिले त्या महिलेला होत असलेला प्रचंड त्रास चौकात असलेले उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य कमर अली लियाकत अली यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ येथील शासकीय रुग्णालयातील आया कमलाबाई यांना आपल्या मोटरसायकलवर बसवून तात्काळ जयस्तंभ चौकात आणले व भर रस्त्यावर सदर महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर सदर महिलेला व तिच्या बाळाला एका मालवाहू रिक्षा मध्ये घालून मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आणले असता त्या महिलेची गंभीर प्रकृती पाहून त्या महिलेला येथील शासकीय रुग्णवाहिकेने अमरावती ला रवाना करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने 108 व 102 सारख्या आपत्कालीन रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या असतांना देखील असे प्रकार घडावे हे संतापजनक नाही का ?  जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमावर लक्षवेधी रुपये खर्च करून सुद्धा त्याचा काहीच फायदा नसल्याचे यावरून सिद्ध होते. Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 20, 2019, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.