अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली.
यावेळी महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयासह, जिल्हा महिला रुग्णालय व शहरातील सर्व शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयातही निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाणार आहे.