ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन - जेलभरो आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यावर प्रहर कार्यकर्त्यांनी स्वतः ला अटक करून घेऊन जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

अमरावती
author img

By

Published : Jul 31, 2019, 4:32 PM IST

अमरावती - शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, दुष्काळग्रस्त घोषित 268 मंडळांना 50 टक्के आणेवारी असल्याने दुष्काळ मदत तातडीने जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा देऊन जेलभरो आंदोलनाद्वारे स्वतःला अटक करून घेतली

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन

आज गडगेनगर येथून प्रहार कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला. महेश देशमुख, वासू महाराज, रोशन देशमुख, रवी वानखडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, तेव्हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतमजुरांना अपघात विमा लागू करावा, इतर मागासवर्गीय गरीबांना स्वतंत्र घरकुल योजना मंजूर करावी, शासनाकडून विधवा महिलांना दरवर्षी 10 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, पीक विम्यात बदल करून शेतकऱ्यांना गत वर्षीची पीक विमा रक्कम तातडीने मिळावी, आशा 15 मागण्या यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी केल्या.

Intro:शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे , दुष्काळग्रस्त घोषित 268 मंडळांना 50 टक्के आणेवारी असल्याने दुष्काळ मदत तातडीने जाहीर कण्यासह विविध मागण्यांसाठी आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेचे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा देऊन जेलभरो आंदोलनाद्वारे स्वतःला अटक करून घेतली.

Body:आज गडगेनगर येथून प्रहार कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला.महेश देशमुख, वासू महाराज, रोशन देशमुख, रवी वानखडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा जिल्जाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतमजुरांना अपघात विमा लागू करावा, इतर मागासवर्गीय गरीबांना स्वतंत्र घरकुल योजना मंजूर करावी, शासनाकडून विधवा महिलांना दरवर्षी 10 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, पीक विम्यात बदल करून शेतकऱ्यांना गत वर्षीची पीक विमा रक्कम तातडीने मिळावी आशा 15 मागण्या यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यावर प्रहर कार्यकर्त्यांनी स्वतः ला अटक करून घेऊन जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.