ETV Bharat / state

दीपाली चव्हाणचे आणखी एक पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट

हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. याप्रकणातील आरोपींना अटक करण्यात आली असून हे प्रकरण राजकीय पक्षांनी उचलून धरले आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाने नेमके काय वळण घेतले ते जाणून घ्या या बातमीत.

दीपाली चव्हाण आत्महत्या,  वनसंरक्षक रेड्डी,  नवनीत राणांची दीपाली चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया,  रवी राणांचे वनमंत्र्यांना पत्र , रुपाली चाकणकर फेसबूक पोस्ट,  मनिषा उईके,  भाजपाची दीपाली चव्हाण प्रकरणात भूमिका,  दीपाली चव्हाण यांचे पतीला पत्र , vinod shivkumar , navneet rana on deepali chavan suicide,  BJP on deepali chavan suicide,
दिपाली चव्हाण
author img

By

Published : Mar 30, 2021, 1:17 PM IST

Updated : Mar 30, 2021, 10:30 PM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्हा हादरला आहे. मृत्यूपूर्वी दिपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या चार पानांच्या पत्राद्वारे वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार हेच दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिवकुमारला नागपुरातून अटक करण्यात आली आणि रेड्डींची नागपूरला बदली करण्यात आली. शिवकुमारला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर दीपाली चव्हाण यांचे अजून एक पत्र समोर आले त्यात त्यांनी मनिषा उईके नावाचा उल्लेख केला आहे. यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.

'मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार!' दीपाली चव्हाण प्रकरणात नवीन ट्विस्ट

दीपाली यांनी मृत्यूपूर्वी आपले पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ते पत्र ईटीव्ही भारतच्या हाती लागले आहे. त्यामध्ये "मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे", अशी ओळ लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दीपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्या,  वनसंरक्षक रेड्डी,  नवनीत राणांची दीपाली चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया,  रवी राणांचे वनमंत्र्यांना पत्र , रुपाली चाकणकर फेसबूक पोस्ट,  मनिषा उईके,  भाजपाची दीपाली चव्हाण प्रकरणात भूमिका,  दीपाली चव्हाण यांचे पतीला पत्र , vinod shivkumar , navneet rana on deepali chavan suicide,  BJP on deepali chavan suicide,
दीपाली चव्हाण यांचे मनिषा उइकेचा उल्लेख असलेलं पत्र..

शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचा कॉल रेकॉर्ड आला समोर -

आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला जबाबदार धरले. त्यामुळे पोलिसांनी शिवकुमारला अटक केली आहे. पोलीस तपासात उपवनरक्षक विनोद शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचे फोन रेकॉर्ड समोर आले.

उपवनरक्षक विनोद शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचे फोन रेकॉर्डवरील संभाषण..

प्रकरण भाजपाने उचलून धरले -

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पती, आई आणि अपर प्रधान उप वनसंरक्षकाच्या नावाने लिहिलेली आहेत. ही तिन्ही स्वतंत्र पत्रे नीट वाचली तर प्रत्येक पत्रात अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी याचा उल्लेख आहे. झालेल्या सर्व प्रकरणाला तो देखील जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात उपवनसंरक्षक शिवकुमार प्रमाणे रेड्डीवर गुन्हा दाखल करून त्याला सहआरोपी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. रविवारी पत्रकार परिषद घेऊन दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणातील गंभीर मुद्द्यांवर शिवराय कुळकर्णी यांनी लक्ष वेधले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष शिवराय कुळकर्णी यांची पत्रकार परिषद..

रेड्डींच्या बदलीवरून भाजपा महिला मोर्चाची टीका -

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेड्डीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. असे असताना राज्य सरकार रेड्डीची बदली नागपूरला करते. खरंतर रेड्डीची नागपूरला झालेली बदली ही राज्य शासनाकडून मिळालेली शाबासकीच आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

दिपाली चव्हाण प्रकरणावर आमदार आणि खासदार राणा यांची प्रतिक्रिया -

दरम्यान, दिपाली चव्हाण यांना शिवकुमार त्रास देत असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहून केली होती. आमदार रवी राणा यांची सही असलेले हे पत्र समोर आले आहे. तसेच रेड्डीवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आधी राज्यपालांकडे तक्रार करणार व नंतर संसदेत आवाज उठवणार, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले. दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर मेळघाटातील 'रेड्डी राज'चे काळे वास्तव समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी तर रेड्डीची मेळघाटात पैसे खाऊ टीम असल्याचा आरोप केला आहे. उपवनसंरक्षक शिवकुमार हा अपर प्रधान उपवन संरक्षक असणाऱ्या श्रीनिवास रेड्डींच्या या पैसे खाणाऱ्या टीमचा एक सदस्य होता, असे नवनीत राणा म्हणाल्या.

खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया..

खासदार राणांवर रूपाली चाकणकर यांचा आरोप -

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. खासदार नवनीत राणा यांच्याकडे मदत मागूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने दीपाली चव्हाण या महिलेचा बळी गेला आहे. राणा या एक महिला खासदार असून आपल्याकडे मदत मागणाऱ्या एका महिलेला जर आपण न्याय देऊ शकत नसाल तर ही खरोखरच घृणास्पद बाब आहे, असही रूपाली चाकणकर म्हणाल्या. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली.

आत्महत्येचा घटनाक्रम -

हरिसालच्या वन परीक्षेत अधिकारी दिपाली चव्हाण यांच्याकडे राहत असलेल्या त्यांच्या आई गुरुवारी जळगावला गेल्या होत्या. त्या सायंकाळी परत येत असताना खामगाव जवळ त्यांना दिपाली चव्हाण यांचा फोन आला. 'आई मी आता शेवटचं बोलते आहे', असे म्हणून दिपाली चव्हाण यांनी फोन ठेवला. यामुळे त्यांच्या आई घाबरल्या आणि त्यांनी हरिसाल येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले. दरम्यान दिपाली यांनी चिखलदरा कोषागारात कार्यरत पतिलाही कॉल करून हे अखेरचा बोलणं असल्याचं सांगितलं. कार्यालयातून निवास स्थानाकडे निगताना ही आपली अखेरची भेट असे दिपाली चव्हाण कर्मचाऱ्यांना म्हणाल्या. ही अखेरची भेट असे म्हणून कार्यालयातून घरी गेलेल्या दिपाली चव्हाण यांच्या बोलण्या वागण्याबाबत कर्मचाऱ्याना संशय आला. त्यांनी कार्यालयासमोरच असणारे चव्हाण यांचे निवासस्थान गाठले. घराचे दार बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरून आवाज दिला. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता, दिपाली चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

काय लिहीलं होतं सुसाईड नोटमध्ये -

खासदार नवनीत राणांकडेही केली होती तक्रार -

गर्भवती असतानाही विनोद शिवकुमार यांनी जबरदस्तीने पहाडावर गस्तीला पाठवले. यामुळे माझा गर्भपात झाला. या दुःखासह शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मी खासदार नवनीत राणा यांच्याकडेसुद्धा तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे.

'सर, तुमचाच त्यांच्या डोक्यावर हात' -

सर सगळ्यांना माहिती आहे की तुमचाच विनोद शिवकुमार यांच्या डोक्यावर हात आहे. मी इतकं लिहून सुद्धा तुम्ही त्याचे काही बिघडवू शकणार नाही, असे दिपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना पत्राद्वारे म्हटले आहे.

तू जगातील सर्वात चांगला नवरा; दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र

दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पतीला एक पत्र लिहिले होते. ते पत्र आता 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागले आहे. काय आहे पत्रात -

प्रिय नवरोबा...लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे.

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेली आहे, खरंच भरून गेली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

पत्र सविस्तर वाचा - तू जगातील सर्वात चांगला नवरा; दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र

Last Updated : Mar 30, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.