ETV Bharat / state

लॉक डाऊन : कामाच्या ताणातही पोलिसांची मानवता, गरजूंसाठी केली जेवणाची व्यवस्था - police distributing food amravati

कोरोना संसर्गासारख्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात ठेवून काम करणे सोपे नसते, तरीसुद्धा पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र, यापलिकडे जाऊन त्यांनी लॉक डाऊनमुळे उपासमार होत असलेल्या गरजवंतांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

गरजूंसाठी केली जेवणाची व्यवस्था
गरजूंसाठी केली जेवणाची व्यवस्था
author img

By

Published : Apr 6, 2020, 10:05 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील पोलिसांवर कामाचा ताण असताना अंजनगाव पोलीसांची मानवता तितक्याच प्रकर्षाने नागरिकांना दिसून आली. सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्याने शहरात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठ, हॉटेल्स सर्वच बंद आहे. अशा स्थितीत अतिशय गरजू, काही शहरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था अंजनगाव पोलिसांनी केली.

कोरोना संसर्गासारख्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात ठेवून काम करणे सोपे नसते, तरीसुद्धा पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र, यापलिकडे जाऊन त्यांनी लॉक डाऊनमुळे उपासमार होत असलेल्या गरजवंतांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

शेवटी पोलिसही वर्दीच्या आतमध्ये एक माणूसच असतो. कर्तव्यावर असतानासुद्धा पोलिसांनी संचारबंदीच्या काळात कोणी उपाशी राहू नये म्हणून काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला आणि कामाच्या व्यापातही पोलिसांनी आपल्या मानवतेचा परिचय दिला. पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

या सोबतच कोरोनाबाबत जनतेने स्वतःची काळजी घ्यावी, संचार बंदीच्या काळात कुणी कारण नसताना फिरू नये, तसेच घराबाहेर पडू नये. अशा सूचना देऊन नियम पाळा-कोरोना टाळा, सतर्क राहा-कोरोना टाळा, प्रशासनाला सहकार्य करा-कोरोना टाळा, हात स्वच्छ धुवा-कोरोना टाळा, मास्क वापरा-कोरोना टाळा, गर्दी टाळा-कोरोना टाळा, आपापल्या घरी बसा-कोरोना टाळा अशा सूचना पोलिसांनी देऊन जनतेला काळजी घेण्याचे तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.