ETV Bharat / state

अकोला मार्गावरील नाकाबंदी ठिकाणावर ट्रकने चिरडल्याने पोलिसाचा मृत्यू - अमरावती पोलिसाचा अपघाती मृत्यू बातमी

अमरावती-अकोला मार्गावर असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर एका भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. चालक ट्रक सोडून पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

file photo
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 3, 2020, 10:41 PM IST

अमरावती - अकोला मार्गावर नाकाबंदी पॉईंट येथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडले. यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गोपाल इंगळे, असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गोपाल इंगळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. अमरावती-अकोला मार्गावर साई हॉटेललगत असलेल्या नाका बंदी पॉईंट येथे ते आपले कर्तव्य बजावत होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. जी.जे. 19 एक्स 3670) भरधाव वेगात अकोल्याकडे जात असताना ट्रक चालकाने ट्रक सरळ गोपाल इंगळे यांच्या अंगावर नेला. ट्रकखाली चिरडल्याने गोपाल इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, त्याचवेळी बडनेरा पोलीस गस्तीवर असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. लोणी पोलिसांच्या मदतीने मृत पोलीस कर्मचारी गोपाल इंगळे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर ट्रक चालकाने काही अंतरावर ट्रक उभा करून पळ काढला. पोलिसांनी शोध घेतला आणि ट्रक बडनेरा पोलीस ठाण्यात आणला.

या घटनेमुळे अमरावती-अकोला मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. घटनेनंतर ट्रक सोडून पळून गेलेल्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.