ETV Bharat / state

अमरावती : पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वऱ्हा गावाच्या परिसरातील पडीक जमिनीवर जुगार भरवणाऱ्या 10 आरोपींना जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने आज (सोमवार) अटक केली. तर ५ आरोपी फरार झाले आहेत.

police arrested 10 gamblers in amravati
पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Jul 6, 2020, 9:36 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वऱ्हा गावाच्या परिसरातील पडीक जमिनीवर जुगार भरवणाऱ्या 10 आरोपींना जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने आज (सोमवार) अटक केली. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. या जुगाऱ्यांकडून रोख रक्कम ४६ हजार तसेच २ दुचाकी, ५ मोबाईल असा एकूण पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सर्व आरोपी वऱ्हा गावाच्या शेतशिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी दरोरोज जुगार भरवत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्याच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आज या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. गेल्या अनेक दिवसांपासून हे आरोपी दरोरोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लाखो रुपयांचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाला होती. त्याच अनुषंगाने आज ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनात ए पी आय अजय आकरे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.